उमराळे रोडवरील वर्कशॉपजवळ ट्रक उलटला

दहा ते पंधरा मोटारसायकलचे नुकसान

उमराळे बुद्रुक ः प्रतिनिधी
गुजरातला जोडणार्‍या नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावर नाशिककडून पेठकडे जाणार्‍या एका ट्रकने वळण घेत उमराळे बुद्रुक- चाचडगाव यामधील रस्त्यावर असलेल्या बेंडकाई माता वेल्डिंग वर्कशॉपमध्ये घुसल्याने जागीच असलेल्या दहा ते पंधरा मोटारसायकलचे नुकसान झाले. एका घराचे नुकसान होऊन ते जमीनदोस्त झाले आहे.
या घटनेत मात्र जीवितहानी टळली असून, त्यात किशोर भारत पवार, अक्षय सतीश वरोडे (मुरुड, जि. लातूर) जखमी झाले आहेत. त्यांना श्रीगुरुदेव जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज विनामूल्य रुग्णवाहिका चालक बापू यांनी खिरकाडे यांनी उमराळे बुद्रुक येथील प्राथमिक केंद्रात दाखल केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिककडून पेठकडे जाणारा ट्रक (एमएच 15- एचके 7743) पेठकडे जात असताना, चाचडगावजवळील बेंडकाई माता वेल्डिंग वर्कशॉपच्या आवारात घुसल्याने चाचडगाव पेट्रोलपंप येथे ट्रक उलटून अपघात झाला.
या अपघाताचे प्राथमिक कारण असे की, गुजरातकडून नाशिककडे जाणारा ट्रक साइडपट्टीच्या खाली उतरून अपघात झाला. यात सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *