मोदी, मोहन भागवत यांच्यावर टीका
नाशिकः नोटा बंदीचा अधिकार हा पंतप्रधानाचा नसून, रिझर्व बँकेचा आहे. पाकीस्तानच्या सीमेवर जाऊन युध्द करण्याची भाषा करणाऱ्या मोहन भागवत यांच्याकडे शस्त्र परवाना आहे का ?हे अगोदर त्यांनी जाहीर करावे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत हे देशातील सर्वात मोठे चोर आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केले.
नाशिकच्या ईदगाह मैदानावर शनिवारी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी संघ व पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टिका केली. व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, अंजली आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, वांचीतच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर, अशोक सोनवणे, राजेंद्र पतोडे, महासेभेचे नाशिकः जिल्हाध्यक्ष प्रविण बागुल, वंचितचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, शहराध्यक्ष अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्वच नेत्यांना मोदी यांच्या मागे उभे राहावे लागत आहेत. विरोधात भूमिका घेणाऱ्या सत्तेचा कोणत्याही पक्षाच्या प्रमुखांवर नेत्यांवर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या चौकश्या लावण्यात आल्या आहेत. नोटाबंदी बाबत न्यायालयाने मोदींच्या वकीलांना चांगलेच फटकारले आहेत. तुम्हाला मोदी, भागवत या दोघांनाही जेल मध्ये बघायचे असेल तर सत्ता बदलावी लागेल. त्यामुळे २०२४ च्या निवडणूकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा. मोदींच्या विरोधातील सर्व नागरिकांपर्यंत जाऊन त्यांना आपल्याकडे आणा. देशात पंतप्रधानांच्या तोडीचा दुसरा माणूसच नाही असे बिंबवले जात आहे. अंन दुर्देवाने आपण सर्व त्याला बळी पडत आहोत. मोदींच्या विरोधात बोलणारे पक्ष आणि खासदार अजूनही जिवंत आहेत, त्यामुळे त्यांच्या चुकीच्या निर्णयाना दोन्ही सभागृहात नक्कीच विरोध होणार आहे. आरएसएस देशासाठी धोकादायक असुन, त्यांना नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे, अशा आशयाचे पत्र लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री असताना पंतप्रधान पंडित नेहरू यांना पाठविले होते, असा खळबलजनक आरोप ॲड आंबेडकर यांनी केला. नरेंद्र मोदी, अमीत शहा अन् भाजपा मुळे देश हुकूमशाही कडे वाटचाल करत आहेत.देशातील जनतेला महागाईच्या खाईत लोटले असून, हे सर्व थांबवीण्यासाठी सर्वांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन ॲड आंबेडकर यांनी केले. धम्म परिषदेस बौध्द भिक्कुसह डॉ.आंबेडकर यांचे हजारो अनुयायी उपस्थित होते.
थेट पंतप्रधान निवडीचे प्रयत्न सुरू
केंद्र सरकारकडून व्यवस्था बदलण्याचे काम सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांचे तर आता थेट पंतप्रधान निवडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हळू हळू भारतातील सर्व नागरिकांचा मेंदु ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालला आहे. असे झाल्यास या देशात न्हावी, कुंभार, लोहार, आदिवासी, कोळी, भटके विमुक्त कधीच पंतप्रधान होणार नाहीत. म्हणजेच तुमचा पंतप्रधान होण्याची संधीच हुकणार आहे. खासदारांची संधी काढून तुम्हाला कायमचे बंदीस्त केले जाण्याची भीती देखील आंबेडकरांनी व्यक्त केली.
चीन प्रश्नी मोदी यांची ५६ इंच छाती १४ इंचावर जाते
चीनचा प्रश्न समोर आला की मोदी यांची ५६ इंच छाती १४ इंचावर जाते. चीन व अमेरीकेचे खेळाचे ॲप बंद करण्याचे नाटक केंद्र शासनाकडून सुरू आहे. बंदीच आणायची ते मग चीनचे पेमेंट गेट वे बंद करून दाखवा असे आव्हानच ॲड. आंबेडकर यांनी मोदी यांना दिले. दरवर्षी या ॲप द्वारे ८ ते १० हजार कोटी रुपये भारतातून ट्रान्स्फर होत आहेत. १५ दिवसांपूर्वीच चीन ने आपली २५०० स्केअर फुट जागा ताब्यात घेतल्याचा गौप्यस्फोटही आंबेडकर यांनी केला. मोदी हे सैन्य पिटाळून लावल्याची खोटी माहिती देत आहेत. संसदेत आपल्या खासदारांनी त्याबाबतचे प्रश्न विचारल्यास खरा त्याला मोदींकडून बगल दिली जात असल्याचा आरोपही केला,
*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…
कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…
अंमली पदार्थ विकणार्यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…