नाशिक: प्रतिनिधी
त्रंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपचे उमेदवार कैलास घुले यांचा शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार यांनी पराभव केला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार लढत झाली. गिरीश महाजन यांनी येथे चांगलाच जोर लावला होता. परंतु शिंदे गटाची सरशी झाली.