आस्वाद

त्वचा व आधुनिक सौंदर्यशास्त्र उपचार

डॉ. सपना गावित

सर्वांनाच आपली त्वचा उजळ, चमकदार, सुरकुत्याविरहित अशी हवी असते, जी उठावदार व्यक्तीमत्त्वाला झळाळी आणते. चांगली बातमी म्हणजे याच विषयाला अनुसरून खूप उत्तम प्रभावी व खिशाला ही परवडेल अशा स्किन रिज्युहिनेशनच्या खूप अप्रतिम व परिणामकारक अशा उपचार पद्धती प्रगतशील काळात उपलब्ध आहेत. एक एम. डी. डॉक्टर व कॉसमेटोलॉजिस्ट म्हणून याबद्दल जागरूकता आणणे हे मला खूप गरजेचे वाटते.
त्वचा हा शारीराचा सर्वात मोठा अवयव आहे आणि त्वचेची निगा व उपचार हा महत्वाचा पण बर्‍यापैकी उपेक्षीत असा विषय आहे. त्वचेची निगा ही खूप काळजीपूर्वक, दक्षतेने व सौंदर्यशास्त्रज्ञाच्या सल्लयाने घेतलेली अतिउत्तम होईल.
आपल्याला हवी असणारी चमकदार, टवटवीत स्किनसाठी, दैनंदिन आयुष्यात मॉईश्चराईजर, सनस्क्रिन, फेसवॉश यांचा वापर आवश्यक आहे. वयाप्रमाणे होणार्‍या बदलांसाठी ऍन्टीएजिंग व ऍन्टी पिगमेंन्टेशन क्रिमही गरजेचे आहे. पण यासंदर्भातही ऍडव्हर्टाझमेंट किंवा औपचारीक सल्लयाचा वापर करून खूप प्रमाणात लोक चुकीच्या प्रॉडक्टसचा वापर करतात व स्किनला इजा पोहचवतात. नकळत पैसा आणि त्वचेचे जास्त नुकसान करतात. यासाठीच सौंदर्यशास्त्रज्ञांचा नक्कीच सल्ला घेणे हे जरूरीचे आहे.
त्वचेचे खालीलप्रमाणे असलेले प्रकार
1. सामान्य त्वचा
2 तेलकट त्वचा
3 कोरडी त्वचा
4 कॉम्बिनेशन त्वचा
5 संवेदनशील त्वचा
या प्रकारांप्रमाणे वापरावयाच्या प्रॉडक्टसमध्येही फरक असतो. त्वचेला नुकसान पोहचवणारे घटक खालीलप्रमाणे आहे,
1. हार्मोनल चेंजेस / बदल
2. युव्हि किरणे
3. ताणतणाव
4. अपुरी झोप
5. इन्फेक्शन ( बॅक्ट / फंगस )
6. खाण्यापिण्याच्या सवयी
7. अयोग्य सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग / वापर
आधुनिक उपचार : पिलींग
याबाबत खूप गैरसमज लोकांमध्ये आहेत. परंतू पिलींगमध्ये खूप परिणामकारक कॉम्बिनेशन प्रत्येक त्वचेप्रमाणे उपलब्ध आहेत. योग्य आणि कौशल्य असलेल्या डॉक्टर्सकडून व त्यांच्या देखरेखी खाली केलेले उपचार हे परिणामकारकच आहेत व फायद्याचे ठरतात. हायड्राफेशियल, पी. आर. पी. मेसोथेरपी इत्यादींचा येथे आवर्जून उल्लेख करता येईल.
लेझर ट्रिटमेंट :
यातही वेगवेगळ्या त्वचेच्या तक्रारींसाठी म्हणजेच मस काढणे, स्किनटॅग रिमुव्हल ते पिंपल्स, पिगमेंटेशन व स्किन टाईटनिंग यासाठी अतिशय उपयुक्त अशा उपचार पद्धतींचा समावेश आहे.
उपचार व फायदे
1 सतेज चेहरा
2 आत्मविश्वास
3 निरोगी त्वचा
4 व्यक्तिमत्व विकास

या सर्वांमध्ये समाधानी व आनंदी आयुष्य याची अनुभूती निश्चितच होते. या सर्वांमध्ये झशीारपशपीं चरज्ञर्शेींशी याचाही उल्लेख गरजेचा वाटतो. भुवया, ओठ यासाठी वरदान अशा ह्या उपचारपद्धती ज्यात जाड भुवया किंवा या प्रकारात मोडणार्‍या व असेही भुवयांना कायमस्वरूपी आकार देता येणारे उपचार आहेत. ओठांचा ही रंग गुलाबीमध्ये बदलणे शक्य आहे. यासाठी माहिती मिळविण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.

-डॉ. सपनाज अरिहंत क्लिनिक
9960735638

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago