केंद्राचा पालिकेला ३१ मार्चचा अल्टीमेटम ?
नाशिक : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणाअंतर्गत पालिकेला मिळालेला निधी पुन्हा जाण्याची शक्यता आहे. केंद्राने
मागील वर्षी मिळालेला अखर्चीत वीस कोटीचा निधी ३१ मार्च पर्यंत खर्च करण्याचा अल्टीमेटम दिल्याचे समजते.
केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी तीस टक्क्यांनी कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात एन-कॅप योजना सुरू केली. आहे. या योजनेत नाशिकचाही समावेश करण्यात आला अाहे. महापालिकेला दोन टप्प्यात वीस कोटी तर चालू आर्थिक वर्षात सहा असा एकूण ४६ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान केंद्राकडून त्यामुळे पालिकेची धावपळ अन्यथा हा निधी पुन्हा केंद्राकडे जाण्याची भीती आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणाअंतर्गत
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका पन्नास इलेक्ट्रिक बसच्या खरेदीसाठी उत्सुक होती. पण केंद्राला स्मरणपत्रे पाठवुनही त्याबाबत अद्याप प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर या योजनेअंतर्गत विद्युत शवदाहिनी, यांत्रिकी झाडू खरेदीचा प्रस्ताव तयार केला. शहरातील अमरधाममध्ये चार ठिकाणी विद्युत दाहिनी बसवण्याचे काम सुरु आहे. तसेच दहा कोटी रुपये खर्च करुन यांत्रिकी झाडूचा प्रस्ताव तयार केला. मात्र, शासनाकडे त्याची स्कुटिनी सुरु असून अद्याप खरेदीला ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित आहे. हा निधी खर्च करण्यासाठी केंद्राने ३१ मार्चची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे महापालिकेने हा निधी परत जाऊ नये यासाठी इ चार्जिंग स्टेशनचे कामाला गती दिली आहे. एन कॅप योजनेअंतर्गत नवीन आर्थिक वर्षात निधी हवा असेल तर कमीतकमी वीस कोटी निधी खर्च करावा लागणार आहे. महापालिकेला मागील तीन वर्षात ४६ कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी तो, मोठ्या प्रमाणात अखर्चित आहे. त्यापैकी वीस कोटी निधी येत्या ३१ मार्चपर्यंत खर्च करावा अन्यथा तो शासनकडे परत जाईल असा अल्टिमेटम महापालिकेला देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे विद्युत दाहिनी, यांत्रिकि झाडू खरेदी, ई – चार्जिंग स्टेशन उभारणे आदी काम मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून कामाची गती वाढल्याचे पहायला मिळते