लखमापुर : वार्ताहर
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलिकांचे भेटी परब्रम्ह आले गा | चरणी वाही भीमा उध्दरी जगा |
मातृ पितृ भक्त पुंडलिक . भक्त पुंडलिकाच्या आपल्या माता पित्याच्या सेवेत असताना साक्षात पांडुरंग वेश बदलून परीक्षा घेण्यासाठी पुंडलिकेचा घरी आले परंतु आई-वडिलांच्या सेवेत पुंडलिक इतके मग्न झाले होते की, आपल्या दारात आलेल्या परमपिता पांडुरंगाचे देखील भान त्याच राहिले नाही. पुंडलिक आई-वडिलांच्या सेवेत इतके मग्न झाले होते की आपल्या दारात आलेल्या भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग चे देखील भान राहिली नाही व त्याने भगवंत कडे पाहिलेच नाही यावेळी भगवंत म्हणाले अरे पुंडलिका मी तुझ्या भेटीला आलो आहे माझ्याकडे पहा तर खरे पुंडलिक भेटी परब्रम्ह आले गा |चरणी वाहे भीमा उध्दरी जगा .परंतु अतिथी देवो भव: यानुसार घरी आलेल्यांचा सत्कार केला पाहिजे म्हणून पुंडलिकांने जवळ असलेली ‘ विट’ पाठीमागे भिरकवली म्हणे यावर उभा राहा.भक्तांचा आदेश मानून भगवंत त्याच ठिकाणी आपल्या भक्तांची वाट पाहात भगवान पांडुरंग उभे राहिले. शेवटी भगवंताने पुंडलिकांस चतुर्भुज रूपाने दिव्य दर्शन दिले. व दिपांनी सर्व नगर प्रकाशमान झाले. तेच पंढरपूर. तेव्हापासून मातृ पितृ भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे हे पुंडलिक रायाने जगाला दाखवून दिले.असे अनेक दाखले संत साहित्यात आपल्याला वाचायला मिळते.
मायबापे केवळ काशी |
तेणे न जावे तिर्थाशी |
पुंडलिका काय केले |
परब्रम्ह उभे ठेले ||
ऐसा होई सावधान |
हृदयी ठेवी नारायण |
तुका म्हणे मायबापे |
अवघी देवाची स्वरूपे||
अशा या भगवंत साक्षात पांडुरंग उभा ठाकलेल्या विठेस २८युगांचा प्रवास झाला आहे. विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत म्हणताच होती दंग आज सर्व संत या उक्तीचा प्रत्यय आज आणि युगे करतांना दिसत आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला याठिकाणी वारकरी बांधवाची मोठी मांदियाळी भरत असते. ते म्हणजे पांडुरंग व पंढरी माहात्म्य जाणुन घेतात.
“लागला टकळा पंढरीचा”
संपदा सोहळा नावडे मनाला |
लागला टकळा पंढरीचा||
जावे पंढरीसी |
कई एकादशी |
आषाढी ये ||
तुका म्हणे ऐसे |
आर्त ज्याचे मनी |
त्याची चक्रपाणी|
वाट पाहे !!
या तुकोबारांयाच्या संत वचनाप्रमाणे प्रत्येक आषाढी व कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या भेटीची ओढ महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांना लागत असते. त्यामुळे या पर्वकाळावर लाखो वारकरी पायी प्रवास करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेत जीवन धन्य करून घेत असतात. कारण महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधवाचे पवित्र दैवत म्हणून विठुरायाकडे पाहिले जाते.तुकोबाराय म्हणतात विटेवरी ज्याची पाऊले समान ,तोची एक दान शुर दाता .पंढरपूर हे क्षेत्र प्रत्येकांला मोक्षाचा मार्ग निर्माण करून देते. म्हणून संत म्हणतात पंढरीचे वारकरी ते मोक्षाचे आधिकारी. मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी असंख्य भाविक मोठ्या धार्मिक भावनेने पंढरपूर ला हजेरी लावतात. वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला एक महत्त्वाचा पर्वकाळ मानला जातो. माऊली निघाले पंढरीला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला .या ध्वनीनादाने पंढरीची वाट आजही दुमदुमून जात आहे.
● आषाढी चे महत्त्व…..
भगवान शंकर यांनी मृदूमान्य नावाच्या राक्षसांला केवळ एका स्त्रीच्या हातुन मरण प्राप्त होईल. असा वर दिला होता. या वरामुळे मृदूमान्य हा राक्षस खुपच ऊन्मत झाला होता. आणि त्यांनी आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही. असा मनात विश्वास ठेवत देवावर स्वारी केली. त्यामुळे देवांनी भगवान शंकराकडे मदतीसाठी धाव घेतली. पण वर दिल्यामुळे भगवान शंकर यांनी या राक्षसांला स्त्रीच्या हातुन मरण आहे. असा वर दिला असल्याचे सांगितले. पण तो उन्मत झाला असेल तर त्याला त्याचे फळ मिळणार असे भगवान शंकरांनी सांगितले.
त्यावेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि या देवीने मृदूमान्य नावाच्या क्रुर राक्षसांला ठार केले. या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना एक प्रकारे स्नान घडले. तसेच सर्वजण या राक्षसांला मारेपर्यंत एका गुहेत लपून बसल्याने या दिवशी या सर्व देवतांना संपूर्ण दिवस एक प्रकारे उपवास घडला. या देवीचे नाव होते एकादशी .त्यामुळे या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र व वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह एकादशी देवीची मनभावे उपासना करतात. महाराष्ट्रातील वारकरी हे व्रत करीत असतात. त्यामुळे आषाढी एकादशी व वारकरी हे समीकरण म्हणजे एकप्रकारे महाकुंभ पर्वणीच मानावी लागेल.
● पांडुरंगाचा रंग काळा का ?
विठोबाला पांडुरंग ही या नावाने ओळखले जाते. याला शास्त्रामध्ये लिखाण आढळते.ते असे पांडुरंग हे नाव पंडरगे ह्या मुळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असुन क्षेत्रनाम म्हणून ही ते वापरले जात होते. असे दिसून येते. पांडुरंग या शब्दाचा अर्थ शुभ्र रंग असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे. असे प्रथमदर्शनी वाटले. तरी तसा अर्थ मराठी संताना अभिप्रेत असल्याचे भासते. त्यामुळे पांडुरंगाला आपण सर्व भगवान विष्णू चा अवतार मानतो व गोपालकृष्ण अवतार म्हणून पांडुरंगाने गोपवेश धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धुळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धुसर झालेल्या गोपालकृष्णांला सर्वांनी पुढे कलीयुगात पांडुरंग म्हटले आहे.