गुन्हे शाखा युनिट-2 मार्फत 1 लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरात व परिसरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 2 मार्फत सातपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलिसांनी दोघा वाहनचोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेली रिक्षा ताब्यात घेतली आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान युनिट 2 कडील अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळाजवळील सुमारे 48 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. त्यानंतर पोलीस हवालदार सुनील आहेर यांना पांडवलेणीजवळील आंगण हॉटेल भागात दोघे जण चोरीची रिक्षा विक्रीसाठी घेऊन येणार आसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर यांना कळवण्यात आली. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार श्रेणी पोउनि यशवंत बेडकोळी, सपोउनि बाळू शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, पोहवा प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, पोअं प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचून प्रदीप जगन्नाथ तुपे (वय 35, रा. राजदूत हॉटेल मागे, सिव्हिल हॉस्पिटल समोर, त्र्यंबकरोड, नाशिक) आणि योगेश बाळू लोखंडे (वय 29, मूळ रा. राजवाडा, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक, सध्या रा. राहुलनगर, टाकळीगाव, उपनगर, नाशिकरोड) या दोन आरोपींकडून चोरीस गेलेल्या एमएच 15 एफयू 3069 या क्रमांकाची 1 लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत करण्यात आली असून, त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबावरून सदर गुन्हा उघडकीस आला आहे.
दोन्ही आरोपी व हस्तगत केलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी सातपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 कडील सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि यशवंत बेडकोळी, सपोउनि बाळू शेळके, चंद्रकांत गवळी, संजय सानप यांच्यासह इतर कर्मचार्यांनी
केली आहे.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…