शेतीमाल, वाहनचोरी करणारे दोघे जेरबंद

म्हसरूळ गुन्हे शाखेची कामगिरी
पंचवटी : वार्ताहर
शहरासह जिल्ह्यात शेतीमाल व वाहनांची चोरी करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून महिंद्रा कंपनीच्या तीन पिकअप गाड्या, होंडा कंपनीची एक दुचाकी व दोन मोबाईल फोन जप्त केले आहे. पोलिसांनी चोरांच्या पिकअपला शिताफीने जीपीएस लावला होता. त्यामुळे त्यांची हालचाल पाहून पोलिसांनी ही कार्यवाही केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी (दि.13) माहिती दिली. बढे यांनी सांगितले की, म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना 10 जून 2025 ला गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अंमलदार म्हसरुळ पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. तेव्हा मिळालेल्या माहितीवरून पोलिस हवालदार राकेश शिंदे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा हा आरोपी योगेश धोंडीराम गांगुर्डे (रा. मडकेजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याने त्याचा साथीदार पप्पू ऊर्फ रवींद्र बाळू पोरे (रा. इंदोरे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी केला आहे. त्यांनी गुन्हा करण्यासाठी चोरून वापरलेली पिकअप गाडी (एमएच 11-टी 3354) ही दिंडोरी रोडने नाशिक शहरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यानुसार हनुमान मंदिराजवळ, दिंडोरीरोड, नाशिक येथे सापळा रचला. समोरून सदरचे वाहन येताच त्यास यांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी हे गाडीसह पळाले. त्यावेळी पथकाने आरोपींचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीने त्याचा मित्र पप्पू उर्फ रविंद्र बाळू मोरे यांच्यासह म्हसरूळ परिसरात सोयाबीन, गहू, तांदूळ चोरी करीत असल्याबाबत सांगितले. तसेच आरोपी त्याच्या साथीदारासह ग्रामीण हद्दीतून ठिकठिकाणी पिकअप गाडी चोरी करून सदर गाडीही सोयाबीन, गहू, तांदूळ चोरी करण्याकरीता वापरायचा. म्हसरूळ व इतर पोलीस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी योगेश धोंडिराम गांगुर्डे यांच्या ताब्यात महिंद्रा कंपनीच्या तीन पिकअप गाड्या सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या, एक होंडा कंपनीची दुचाकी व दोन मोबाईल फोन अंदाजे किंमत 84 हजार 500 रुपये मिळून आल्या आहेत. तसेच एक लाख 53 हजार रुपये किमतीचा सोयाबिन, गहू, तांदळाचा 32 क्विंटल शेतमाल, असा दहा लाख 87 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यांनी केली कामगिरी कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (परिमंडळ 1) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त (पंचवटी विभाग) पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलिस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक दीपक पठारे, हवालदार बाळासाहेब मुर्तडक, देवराम चव्हाण, राकेश शिंदे, सतीश वसावे, अंमलदार पंकज चव्हाण, पंकज महाले, गुणवंत गायकवाड, प्रशांत देवरे, स्वप्नील गांगुर्डे, जितू शिंदे, गिरीश भुसारे यांनी केली आहे.

जीपीएसमुळे चोरटे जाळ्यात

पोलिसांनी चोरांच्या पिकअपला शिताफीने जीपीएस लावला होता. त्यांच्या हालचालीवर निगराणी ठेवली होती. रात्री उशिरा या गाडीची हालचाल सुरू झाल्याचे पोलिसांना लक्षात आले. ती पाहून पोलिसांनी ही कार्यवाही केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *