शेततळ्यात बुडून दोघा भावांचा मृत्यू

खामखेडा : प्रतिनिधी
खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील  शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने  बुडून मृत्यू झाला.दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 खामखेडा गावातील बुटेश्वर  शिवारातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात.त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर व मानव आहेर हे सकाळची शाळा करून घरी गेले असता. दुपारी शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने आई वडिलांना मदतीसाठी शेतात होते. दुपारच्या वेळेस जंगलातून शेतात आलेल्या वांनराना हुसकवुन लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे गेले. वानरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला.त्याला वाचवण्यासाठी मानव यांनी हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र शेततळे अर्धे भरले असल्याने तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.
शेजारील शेतकरी हरेश  शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यु झाला. मृत्यू झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय देवळा येथे शवविच्छेदनासाठी आणून नंतर उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.तेजस आहेर  हा खामखेडा येथील जनता  विद्यालयात इयत्ता सहावीत तर व मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत शिकतात.गणेश आहेर यांच्या दोनही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *