शहरात द्राक्ष आपल्या दारीं अभियान राबविले जाणार
नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कृषीमालाला रास्त दर मिळण्यासाठी विकेल ते पिकेल या योजने अंतर्गत आणि पोलीस कुंटूबाकडुनह शेतकऱ्यांच्या कृषीमाल विक्रीसाठी सहभाग असावा यासाठी अनेकजण पुढे येत आहे. पोलीस आयुक्तांची आग्रही सहभाग आणि ग्रीनफिल्ड अँग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात महा द्राक्ष महोत्सवाचे महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर सिटीसेंटर माँल समोरील लक्षिका सभागृहात शनिवारी (दि.१८) सकाळी नऊ वाजता उदघाटन होणार असल्याची माहिती ग्रीनफिल्ड चे अध्यक्ष अमोल गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या हस्ते हे उदघाटन होइल. दोन दिवस हा महोत्सव सुरु राहणार आहे. नैसर्गिक आपत्तीचे संकट, कोरोनाच्या काळात मातीमोल झालेले दर, तर व्यापाऱ्यांकडुन होणारी द्राक्ष उत्पादकांची लुट, ही पार्श्वभुमीवर ग्रीनफिल्डचे अध्यक्ष अमोल गोऱ्हे यांनी नाशिकमध्येच द्राक्षाला चांगला दर मिळवून देण्यासाठी आणि नाशिककरांना रास्त दरात द्राक्ष मिळण्यासाठी पुढाकार घेवुन सलग १०० दिवसांचा महा द्राक्ष महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी देखील सहभाग घेवून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कुंटूबाचा शेतकऱ्यांच्या विकासासाठी हातभार लागावा यासाठी प्रत्येक विक्री केंद्रावर पोलीस कुंटूबातील सदस्य उपस्थित रहाणार आहे. तसेच राज्य शासनाने नाशिक शहरात शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी जागा निवडलेल्या आहे, त्या जागांवर ही द्राक्ष विक्रीची केंद्र रहाणार आहे.तर गुरुवारी पोलीस पाल्य आणि पत्नीना शेतकरी आणि शेतीमाल विक्रीचे सकारात्मक मार्गदर्शन चला हवा येवू द्या या मालिकेचे लेखक अरविंद जगताप आणि शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी मार्गदर्शन केले. तर विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी पोलीस पत्नी आणि पाल्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा, मार्केटिंग आणि नफ्याचे गणित समजुन सांगितले. , राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच महोत्सवाच्या लोगोच प्रकाशन करण्यात आले आहे. तसेच महोत्सवादरम्यान विविध दिवशी जागतिक महिला दिनाच्या निमित्तीने शेप विष्णु मनोहर हे महिलांना द्राक्षापासुन तयार होणारे खाद्यपदार्थ, द्राक्षांचे दागिने याबाबत माहिती देणार आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, कृषी विभाग, पोलीस प्रशासन, पणन महामंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच प्रत्येक प्रभागात स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.
शहरात विविध ४५ ठिकाणी द्राक्ष विक्री
प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी म्हंटले आहे कि नाशिक ची ओळख हि द्राक्ष व रुद्राक्ष यामुळे आहे. त्यामुळे द्राक्षांचा पण महोत्सव हा महाशिवरात्रीपासुन करण्याचे आयोजन केले आहे. तसेच नाशिक शहरात विविध ४५ ठिकाणी १०० दिवस शेतकऱ्यांची दर्जेदार द्राक्ष थेट नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
…
ना. विखे पाटलांच्या हस्ते द्राक्ष उत्पादकांचा गौरव
महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट द्राक्ष उत्पादकांचा गौरव, तर वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्कृष्ट द्राक्ष विक्रेता पोलीस पाल्य, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि द्राक्ष उत्पादकांचा गौरव करण्यात येणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…