पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्या
लासलगाव:-समीर पठाण
पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारी निफाड पूर्व भागात हजेरी लावत दोन तास धुवांधार बॅटिंग केली होती.त्यानंतर झालेल्या पावसाने गोंदेगाव (ता.निफाड) येथील दोन शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्याने सुमारे साडे अकरा लाखांचे नुकसान झाले आहे.
कारभारी विठ्ठल नाईक यांच्या ४०८/०१ या गट नंबरमधील ६१ फूट खोल विहिरीचे १४ कठडे पावसामुळे पडल्याने साडे सात एच पी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार आणि कनेक्शनसह दाबल्या गेल्याने साडे सहा लाखांचे नुकसान झाले.तर गट क्रमांक ३९६ मधील पंढरीनाथ गणपत निकम आणि संजय निकम यांची सामाईक ५६ फुल खोल विहीर,१५ सिमेंट, इलेक्ट्रिक मोटार आणि कनेक्शन असे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी पराग साळवे यांच्यासह सहायक शरद खंडीझोड,कोतवाल किशोर गाढे यांनी स्थळपाहणी करत पंचनामा केला.यावेळी कृष्णा शिरापुरे,विजय नाईक,नवनाथ निकम,प्रतीक नाईक आदी शेतकरी उपस्थित होते.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…