नाशिक: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी मोठ्याप्रमाणात विरोधी पक्षतील मंडळी सत्तेच्य सावलीत जाणे पसंत करत असून, आज आणखी काही पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत. शहरातील दोन माजी महापौर, काँग्रेसचे माजी नगरसेवक यांच्यासह मनसे चे काही पदाधिकारी भाजपा मध्ये प्रवेश करणार आहे. सकाळी 11 वाजता हा प्रवेश सोहळा होणार आहे. काल च माजी नगरसेवक राहुल दिवे, आशा तडवी यांनी प्रवेश केला ते भाजपात जातील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता आज होणाऱ्या प्रवेश सोहळ्यात कोण कोण प्रवेश करतो याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.