कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या
दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील बिल्व तिर्थ तलावावर धुणं धुण्यासाठी गेलेल्या मुलींचा मृत्यू घडल्याची दुर्दयी घटना घडली आहे. त्र्यंबक नगर परिषद तीन दिवसांत एकदा पाणी पुरवठा करत आहे. तो देखील अनियमित व अपुरा असल्याने नागरिक मिळेल तेथून पाणी आणतात, धुणं धुतात याचा हा बळी ठरला आहे.त्र्यंबकेश्वर येथील तनुजा युवराज कोरडे, वय 13 वर्षे चौकीमाथा, अर्चना बाळू धनगर, वय 13 वर्षे
चौकिमाथा या दोन मुली सकाळी 11 वाजेच्या सुमारास
बिल्व तीर्थ येथे कपडे धूत असताना पाय घसरल्याने अर्चना पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तनुजा गेली असता ती देखील बुडाली.ही माहिती मिळताच नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. मुलींना बाहेर काढले मात्र तो पर्यंत त्या मयत झाल्या होत्या. बिल्व तिर्थ तलाव काही वर्षापूर्वी गाळ व मुरूम काढून खोल केला तेव्हा पासून येथे पाण्यात बुडून जीवित हानी होण्याच्या घटना घडत आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे नळ पाणीपुरवठा वेळेत होत नाल्याने अशा प्रकारे नागरिक पाण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत.
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…