दिलासा : 12 , 28 टक्क्यांचा स्लॅब बंद होणार
नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने जीएसटीचे स्लॅब घटवून दोन केले आहेत. आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के जीएसटी असेल. तर, 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे बंद केला जाईल. काल झालेल्या बैठकीत मंत्रिगटाने केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे.
सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के या चारपैकी दोन स्लॅब बंद केले जाणार आहेत. त्यामध्ये 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे संपवण्यात येईल. यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल. 12 टक्के स्लॅबमध्ये असलेल्या वस्तू आणि सेवा 5 टक्क्यांमध्ये येईल. तर, 28 टक्के स्लॅबमधील जवळपास 90 टक्के वस्तू 18 टक्क्यांमध्ये येतील. तंबाखू आणि पान मसाल्यावर अधिक जीएसटी अधिक असेल.
12 टक्के स्लॅब बंद करून त्यातील वस्तू आणि सेवा 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणल्याने कर 7 टक्क्यांनी कमी होईल. यामुळे कपडे आणि रेडिमेड कपडे, चप्पल, बूट, प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, होम अप्लायन्सेसवरील कर कमी होईल. या बदलाचा थेट परिणाम मध्यमवर्गावर आणि सर्वसामान्य ग्राहकांवर होईल. काही वस्तूंच्या किमतीवर लागणारा कर 10 टक्क्यांनी कमी होईल. यामुळे दुचाकी वाहने, चारचाकी कार, सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनर, टीव्ही यांचा समावेश होतो. पॅकेजमधील अन्नपदार्थ, बेवरेजेस, पेंट्स आणि वॉर्निश यावरील कर कमी होतील. यामुळे ग्राहकांसह रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये विक्रीत तेजी येऊ शकते.
विमा स्वस्त होणार
आरोग्य आणि जीवन विमा यावरील जीएसटी माफ करण्याच्या प्रस्तावावर मंत्रिगटाच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये वैयक्तिक आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील प्रीमियमवर जीएसटी माफ करण्याबाबत चर्चा झाली.
28 टक्के स्लॅबमधील जवळपास 90 टक्के वस्तू 18 टक्के स्लॅबमध्ये आणल्याने त्या वस्तूंच्या किमतीवर लागणारा कर 10 टक्क्यांनी कमी होईल. दुचाकी वाहने, चारचाकी कार, सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनर, टीव्ही यांचा समावेश होतो. पॅकेजमधील अन्नपदार्थ, बेवरेजेस, पेंट्स आणि वॉर्निश यावरील कर कमी होतील. यामुळे ग्राहकांसह रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये विक्रीत तेजी येऊ शकते.
कपडे स्वस्त होणार
12 टक्के स्लॅब बंद करून त्यातील वस्तू आणि सेवा 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणल्याने कर 7 टक्क्यांनी कमी होईल. यामुळे कपडे आणि रेडिमेड कपडे, चप्पल, बूट, प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, होम अप्लायन्सेसवरील कर कमी होईल. या बदलाचा थेट परिणाम मध्यमवर्गावर आणि सामान्य ग्राहकांवर होईल.