दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील गॅस गळतीमुळे आग लागून दोघांचा भाजून मृत्यू झाला आहे,याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,गौतम अच्छेलाल व कुमार सुनील (दोघे रा.कोपागाव,बडागाव) जि.लखीमपूर उत्तर प्रदेश येथील असून,हे दोघे त्यांचे राहते रुममधे असताना गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन पेट घेतल्याने या दुर्घटनेत गौतम अच्छेलाल हा शंभर टक्के भाजला,नाशिकच्या सिद्धी विनायक हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर कुमार सुनील याचाही दुर्दैवाने अंत झाला आहे,याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद प्राप्त अहवालाद्वारे दिंडोरी पोलीसात करण्यात आली असून दोघांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सहकाऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.