मनमाडला शिक्षक मतदारांना पैसे वाटप करताना कोल्हे यांच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पकडले

मनमाड : प्रतिनिधी

शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक विभागाची निवडणूक चर्चेत आली  आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आमदार  किशोर दराडे यांच्यात कलगीतुरा बघायला मिळाला. असाच काहीसा प्रकार मनमाड आणि येवल्यात समोर आला आहे.उद्या होणाऱ्या या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला समोर आला असून पोलिस आणि तहसील विभागाच्या पथकाने मनमाडच्या गणेश नगर भागात एका बंगल्यावर छापा मारून शिक्षक मतदारांना देण्यासाठी आणलेले पैशांचे 45 पाकीटे जप्त केले .

या प्रकरणी दोन जणांनाताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एका पाकिटात 5 हजार असलेले 45 पाकीट सोबत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे प्रचाराचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी एस. एम गुळवे यांनी दिली आहे

नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यात तिरंगी लढत होत असून पैठणी सफारीचा कापड सोन्याची नथ पाच हजाराचे पाकीट अशा इतर प्रलोभन देणाऱ्या वस्तूंच्या आमिष दाखवून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे याच अनुषंगाने शनिवारी व रविवारी तीनही उमेदवारांकडून ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यात मोठ्या प्रमाणावर दारू व मटणावर गुरुजी तर्फे का मारण्यात आला आणि उद्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मनमाड व येवला येथे मतदारांना वाटण्यासाठी पैशाचे पाकिटे आणण्यात आली होती मनमाड पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाई गुप्त माहितीच्या आधारे मनमाड शहरातील गणेश नगर या भागात एका बंगल्यावर धाड टाकण्यात आली या ठिकाणी पाच हजार रुपयाची सुमारे 45 पाकिटे जप्त करण्यात आली या ठिकाणाहून संजीवनी कॉलेज येथील रेवनाथ माधव रजपूत व जयेश वसंतराव थोरात या दोन संशोधन देखील अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मंडळ अधिकारी एसएम गुळवे यांनी दिली आहे

मनमाड पाठोपाठ येवल्यातही कारवाई…!
मनमाड येथे दुपारी पैसे वाटप करणाऱ्या संजीवनी कॉलेजच्या दोन जणांना अटक करण्यात आली यानंतर मनमाड पाठोपाठ येवल्यातही अशीच कारवाई करण्यात आली असून येथे ही शिक्षक मतदारांना पैसे वाटप करण्याच्या संशया वरुन दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *