कळवण बस व कारच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू
बस व डिझायर आगीत खाक
दिंडोरी: अशोक केंग
नाशिक वरून कळवण डेपो ची गाडी जात असताना आक्राळे फाट्यावर कारचा अपघात झाल्याने दोन्ही गाड्यानी पेट घेतल्याने कार मधील दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. तसेच बसमधील आणि प्रवासी आपला जीव घेऊन बसमधून बाहेर उतरल्याने अनेक प्रवासांचे प्राण वाचले आहे असा प्राथमिकअंदाज आहे.
सविस्तर वृत्त असे की नाशिक येथून कळवण डेपोची क्र. MH. 06 S. 8439 या क्रमांकाची बस अनेक प्रवासी घेऊन कळवण येथे जात असताना दिंडोरी तालुक्यातील आक्राळे फाटे जवळ कार व बसचा अपघात झाल्याने कारमधील दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज समजला आहे. या अपघातात बलेनो
कार ही पूर्ण जळून खाक झालली आहे.तसेच कळवण डेपोची बस ही पण पूर्ण पेटल्याचे दिसत असल्याने अनेक प्रवासांनी आपला जीव मुठीत घेऊन पळ काढल्याने मोठी जीवित हानी टळली आहे.