एकाच दिवशी दोन जण लाचलुचपतच्या जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
एकाच दिवशी नाशिकरोड विभागीय कार्यालयातील विभागीय तांत्रिक अधिकारी आणि घोटी पोलीस ठाण्यातील पोलीस लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
नाशिकरोड विभागीय कार्यालयातील तांत्रिक अधिकारी राजेंद्र भागवत केदारे यांनी तक्रारदार यांच्या भावाच्या पत्नी या महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून त्यांना जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. त्यावर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे अपील सुरु होते. या अपिलाचा निकाल हा तक्रारदार यांच्या वहिनीच्या बचत गटाच्या बाजूच्या लागल्याने सदर अपीलाचा निकालाची प्रत देण्यासाठी केदारे यांनी 15 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. दहा हजार रुपयांवर तडजोड केल्यानंतर दहा हजार रुपये स्वीकारताना केदारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
घोटीत पोलीस पाचशेची
लाच घेताना जाळ्यात
घोटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विकास चंद्रकांत झालटे यांना पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार यांची पिकअप गाडी असून तेघोटी हद्दीत प्रवाशी आणि माल वाहतूक करतात. गाडी सुरू ठेवण्यासाठी तसेच गाडीवर कारवाई करू नये म्हणून पाचशे रुपयांची पंचा समक्ष लाच स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक मीरा आदमाणे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पंकज पळशीकर,प्रमोद चव्हाणके, दीपक पवार, विनोद पवार यांनी ही कारवाई केली. अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…