छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सतीश आगळे (वय 18) आणि गौरव आगळे (वय 16) हे दोन भाऊ कुटुंबातील व्यक्ती लग्नासाठी बाहेरगावी गेले असता ते शेततळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेले. तिथे पोहोचल्यावर मासे पकडण्यासाठीची जाळी तळ्यात फेकली. मात्र, या जाळीमध्ये त्यांचा पाय गुंतून पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या तरुणांचा पाण्यामध्ये शोध घेण्यात येत आहे.