नाशिक

मोबाइल स्नॅचिंग करणारे दोन संशयित पोलिसांच्या जाळ्यात

सिन्नर, वावी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरीत गुन्हे केल्याची कबुली

सिन्नर : प्रतिनिधी
फोनवर बोलत रस्त्याने पायी चालणार्‍या व्यक्तीचा मोबाइल दुचाकीवरून येऊन हिसकावून पळ काढणार्‍या दोघा संशयितांना सिन्नर पोलिसांनी गजाआड केले आहे. अरबाज सत्तार शहा (19, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) असे पहिल्या दिवशी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संशयित शाहरूख उर्फ चपट्या अफसर शेख (रा. डावखररोड, श्रीरामपूर) हा सोबत असल्याचे अरबाज याने सांगितल्यावर पोलिसांनी शाहरुख याला दुसर्‍या दिवशी श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.
सिन्नर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांमध्ये अनेक तालुक्यातील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ते पोलिसांना हवे होते. शिर्डी महामार्गावर वावी वेस परिसरात हॉटेल अन्नपूर्णासमोर रविवारी गोरख संजय लासनकर यांचा मोबाइल फोन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरून नेला होता. ते फोनवर बोलत चालले असताना, पाठीमागच्या बाजूने आलेल्या चोरट्यांनी त्यांचा मोबाइल फोन हिसकावून लंपास झाले. याप्रकरणी लासनकर यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी विशेष पथकास सूचना केल्या होत्या.
त्यानुसार शोधपथकातील अंमलदार समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे नितीन डावखर, आप्पा काकड, प्रशांत सहाणे, हरीश आव्हाड, मनीष मानकर, रवींद्र चिने यांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. लासनकर यांचा मोबाईल फोन चोरणारे दोघेजण वावी वेस परिसरात फिरत असल्याची माहिती पथकास मिळाली.
त्यावेळी एक संशयित मोटारसायकलवर बसलेला होता. तर दुसरा मोटारसायकलच्या बाजूला उभा होता. मात्र, त्यांनी पोलिसांना ओळखल्यामुळे मोटारसायकलवरील आरोपी फरार झाला व उभ्या असलेल्या आरोपीस पोलिसांनी पकडले.

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago