नाशिक

इगतपुरी रेल्वेस्थानकात दोन दहशतवाद्यांना अटक?

मॉकड्रील असल्याचे माहीत पडल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला

इगतपुरी : प्रतिनिधी
शुक्रवारी (दि. 23) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास इगतपुरी रेल्वे बुकिंग व प्रतीक्षालय येथे दोन दहशतवादी संशयितरीत्या लपून बसल्याची खबर इगतपुरी लोहमार्ग पोलीस निरीक्षक बालाजी शेंडगे यांना समजली. मात्र, हा सर्व प्रकार मॉकड्रील असल्याचे माहीत पडल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
त्यांनी तात्काळ रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राजकुमार धनवीज यांना कळवून घटनास्थळी धाव घेऊन सदर परिसराचा ताबा घेऊन परिसर निर्मनुष्य करून योग्य तो बंदोबस्त तैनात करण्यात आला. लागलीच क्यूआरटी पथक, नाशिक ग्रामीण पोलीस पथक, कल्याण येथील सुरक्षा बल पथक, डॉग स्कॉड पथक, ठाणे येथील पोलीस अधिकारी व पोलीस पथक, इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन पथक, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे पथक यांना पाचारण करण्यात आले.
प्रथम क्यूआरटी पथकाने मोहीम राबवून प्रतीक्षालयाचा ताबा घेतला.लपून बसलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना निशस्त्र करून प्रतीक्षालयाबाहेर आणले.
कल्याण येथील डॉग स्कॉडच्या स्नुफी डॉग व रॉकी डॉग यांच्या मदतीने दोन संशयितांकडे मिळून आलेल्या बॅगेची तपासणी करण्यात आली. डॉगने बॉम्बसदृश वस्तू असल्याचे सूचित केले. बॉम्बस्कॉड पथकाने त्यांच्या जवळील यंत्रसामग्रीने बॅगची तपासणी केली असता, त्यात दिवाळीचे सुतळी बॉम्बचे फटाके व घरगुती वापराचा चाकू व कपडे मिळून आले. सदरची बॅग व दोन संशयित आरोपी यांना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई सुरू असताना रेल्वे प्रवासी व नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र, हा सर्व प्रकार मॉकड्रील असल्याचे माहीत पडल्यावर सर्वांनी सुटकेचा
निःश्वास सोडला. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रील राबवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हेमंत घरटे यांनी दिली.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago