नाशिक

मालेगाव महापालिकेत नमाज पठणाचा प्रकार

राजकीय वाद; भाजप नेते सोमय्यांचा तीव्र आक्षेप

मालेगाव : प्रतिनिधी
शहरात अनेक नागरी समस्या असताना, पथदीपांच्या तक्रारीसंदर्भात महापालिकेत गेलेल्या काही संतप्त नागरिकांनी थेट विद्युत विभागाच्या अधीक्षकांच्या दालनात नमाजपठण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर तीव्र आक्षेप घेत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
केली आहे.
शहरातील बंद पथदीपांच्या समस्येबाबत ‘लोकसंघर्ष समिती’ या संघटनेने महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर समितीचे लुकमान कमाल यांच्यासह काही नागरिक सोमवारी महापालिकेत गेले होते. विद्युत विभागाच्या अधीक्षकांना भेटण्यासाठी ते त्यांच्या कार्यालयात गेले; मात्र अधीक्षक बैठकीसाठी बाहेर गेल्याने नागरिकांना दालनातच थांबावे लागले. बराच वेळ प्रतीक्षा करूनही अधीक्षक परत न आल्याने सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास रमजान महिन्यातील नमाजाच्या वेळेस उपस्थित नागरिकांनी अधीक्षकांच्या रिकाम्या दालनातच नमाजपठण केल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या हे मंगळवारी मालेगाव दौर्‍यावर होते. जन्मदाखल्यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चर्चा करून मुंबईत परतल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, महानगरपालिका ही सार्वजनिक शासकीय वास्तू असून, अशा ठिकाणी धार्मिक कृत्य करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले.

पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी सोमय्या यांनी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव तसेच अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शासकीय कार्यालयात नमाजपठण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. नव्या वादामुळे मालेगावचे राजकारण तापले आहे. सदर प्रकाराच्या निषेधार्थ भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Type of Namaz in Malegaon Municipal Corporation

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

5 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

5 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

6 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

6 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

6 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

6 hours ago