सुधाकर बडगुजर
(मते 19,834)
अतुल सानप
(4,970)
साधना मटाले
(14,133)
शोभना शिंदे
(10,486)
कविता नाईक
(15,330)
भाग्यश्री ढोमसे
(7,667)
मुरलीधर भामरे
(9,191)
अनिल मटाले
(8,285)
महापालिका निवडणुकीत नाशिक शहरात महिनाभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यातच भाजपने शंभर पारचा नारा देत साम- दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब केला. तरीही विरोधकांनी त्यांना सत्तरीतच रोखले. मात्र, मागील वेळेपेक्षा सहा जागांचा षटकार मारत भाजपने मैदान मारून महापालिकेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. दुसरीकडे, त्यांच्या विरोधात असलेल्या युतीतील त्यांच्या मित्रपक्षांंनी सवतासुभा निर्माण करून (सध्या विरोधक असलेल्यांनी)
जीवाचे रान करत आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक 25 मध्ये अ गटातून भाजपाचे सुधाकर बडगुजर आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. अतुल सानप यांच्यात लढत झाली. ब गटातून भाजपाच्या साधना मटाले आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभना शिंदे आमनेसामने होत्या. क गटातून भाजपा पुरस्कृत भाग्यश्री ढोमसे आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता नाईक, तर ड गटातून भाजपा पुरस्कृत प्रकाश अमृतकर व शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल मटाले आणि महाविकास आघाडीचे मुरलीधर भामरे यांच्यात तिरंगी लढत झाली.महापालिकेच्या 122 जागांमध्ये ज्या काही तुल्यबळ आणि काही लक्षवेधी लढती होत्या, त्यात सिडको परिसरातील प्रभाग 25 मधील सुधाकर बडगुजर यांची जणू काही अस्तित्वाची लढाई होती. पूर्वी शिवसेनेत (उबाठा गट) असलेले सुधाकर बडगुजर अनेक पदे भोगून मागील वर्षी भाजपामध्ये आले आणि त्यांनी आपले बळ दाखविण्यास सुरुवात केली. निष्ठावंतांचा प्रचंड प्रमाणात विरोध होऊनही त्यांनी घरातच दोन तिकिटे घेतली. तरीही निष्ठावंत आणि बंडखोरीचा फटका बसल्याने त्यांच्या मुलाला पराभव पत्करावा लागला. मात्र, स्वतः सुधाकर बडगुजर यांनी मैदान मारून 122 उमेदवारांमध्ये सर्वाधिक म्हणजे विरोधी उमेदवारापेक्षा सुमारे 15 हजार मतांची आघाडी घेऊन आपला दणदणीत विजय दाखवून दिला. मात्र, याच प्रभागात साधना मटाले या भाजपाच्या नवख्या उमेदवारालाही मतदारांनी निवडून दिले. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाच्या कविता नाईक यांनीही विजय मिळवला, तर शिवसेना उबाठा गटाचे मुरलीधरतात्या भामरे यांनी सलग तीन वेळा सुधाकर बडगुजर यांच्याकडून पराभूत झाल्यावरही जिद्द न सोडता चौथ्यावेळी विजय मिळवून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
प्रभाग क्रमांक 25 हा प्रामुख्याने सिडको आणि कामटवाडे परिसराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या प्रभागात रायगड चौक, पाटीलनगर, सावतानगर, उंटवाडी गावठाण आणि त्रिमूर्ती चौक यांसारख्या प्रमुख रहिवासी क्षेत्रांचा समावेश होतो. या भागात मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाची मोठी वस्ती आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून सुधाकर बडगुजर (शिवसेना), हर्षा बडगुजर (शिवसेना), भाग्यश्री ढोमसे (भाजप), श्यामकुमार साबळे (शिवसेना) यांनी विजय मिळवला होता.
अवघ्या सिडकोचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये अपेक्षित आणि अनपेक्षित असे निकाल लागले आहेत. या प्रभागातून भाजपचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि साधना मटाले अनुक्रमे अ व ब गटातून विजयी झाले, तर क गटातून भाजपच्या भाग्यश्री ढोमसे यांचा पराभव करीत शिवसेनेच्या (शिंदे गट) कविता नाईक विजयी झाल्या. ड गटातून शिवसेना उबाठाचे मुरलीधर भामरे यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार प्रकाश अमृतकर आणि शिंदेसेनेचे अनिल मटाले यांचा पराभव केला.
खरे म्हणजे हा प्रभाग फारच चर्चेत होता. बडगुजर यांनी त्यांच्या पत्नीसह उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपने त्यांना एबी फॉर्मही दिले होते; परंतु यावरून वादविवाद झाल्याने बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी माघार घेतली होती. त्या जागेवर भाजपने ऐनवेळी भाग्यश्री ढोमसे यांना पुरस्कृत उमेदवार केले. क जागेसाठी अखेरपर्यंत एबी फॉर्मचा गुंता न सुटल्याने अखेर प्रकाश अमृतकर यांना भाजपने पुरस्कृत उमेदवार केले. या जागेवर बडगुजर यांनी त्यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना उभे केले होते. परंतु यावरून गदारोळ माजल्याने पक्षश्रेष्ठींनी दीपक बडगुजर यांना अर्ज मागे घ्यायला लावला होता. या जागेसाठी भाजप, शिवसेना आणि उबाठा या तीनही पक्षांचे उमेदवार होते. प्रकाश अमृतकर (भाजप पुरस्कृत), अनिल मटाले (शिवसेना), मुरलीधर भामरे (उबाठा) यांच्यात काट्याची लढत झाली. त्यात भामरे यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे, या प्रभागात पैसे वाटण्याचे मोठे प्रकार घडल्याची चर्चा आहे. यावरून प्रभागात अनेकदा वादावादीही घडली होती. बडगुजर यांनी विजयाचा चौकार मारला आहे. साधना मटाले, कविता नाईक आणि मुरलीधर भामरे यांनी प्रथमच महापालिकेत पाऊल टाकले आहे. मुलाच्या
पराभवामुळे भाजपचे सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांनी गुलालाची उधळण आणि मिरवणूकसुद्धा काही प्रमाणात टाळली
आहे.
प्रभाग क्रमांक 25 हा प्रामुख्याने सिडको आणि कामटवाडे परिसराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या प्रभागात रायगड चौक, पाटीलनगर, सावतानगर, उंटवाडी गावठाण आणि त्रिमूर्ती चौक यांसारखा प्रमुख रहिवासी क्षेत्रांचा समावेश होतो. या भागाची अंदाजित लोकसंख्या 38 हजार ते 42 हजारांच्या दरम्यान आहे. येथे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाची मोठी वस्ती आहे. या प्रभागातील मुख्य समस्यांचा विचार करता, अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित काँक्रीटीकरण, पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी आणि त्रिमूर्ती चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी हे मोठे प्रश्न आहेत. जुन्या सिडको वसाहतींमधील ड्रेनेज लाइनची दुरुस्ती आणि उद्यानांचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिक वारंवार करत असतात. आता नव्याने निवडून आलेले नगरसेवक या प्रश्नांंकडे कसे लक्ष देतात? आणि पाठपुरावा करून ते प्रश्न कसे व केव्हा सोडवतात? याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः सुधाकर बडगुजर यांनी या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याने त्यांना नागरिकांनी पुन्हा एकदा निवडून दिले, असे बोलले जात आहे. परंतु अद्याप अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते कसे सोडवले जातील आणि नवनिर्वाचित व नवखे तीन नगरसेवक कोणती विकासकामे करतात, याची चर्चा आता प्रभागात सुरू आहे.
Ubatha in Badgujar’s ward, Shinde Sena also has a lot of power
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…