उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह स्मारकावर केले अभिवादन

मुंबई :

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. 23) संपूर्ण राज्यात अभिवादनाचे कार्यक्रम पार पडले. या पाश्वर्र्भूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह कुलाबा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि कार्याला वंदन केले. याप्रसंगी परिसरात श्रद्धा आणि भावनिकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
या अभिवादन सोहळ्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, उपनेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, नगरसेवक तसेच विविध पदांवरील पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी माणसाच्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, निर्भीड नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळे त्यांनी लाखो शिवसैनिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आजही त्यांचे विचार शिवसेनेच्या राजकीय वाटचालीस मार्गदर्शक ठरत आहेत.

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर अमीट ठसा उमटवणार्‍या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याप्रति भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत, त्यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्याची आठवण करून दिली. पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले की, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, राबविण्यात येणार असून, गडकोट प्लास्टिकमुक्त केले जातील. या मोहिमेंतर्गत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यात येणार असून, शिवभक्तांच्या स्वयंसेवी संस्थांना एक लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. तसेच ‘बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ अंतर्गत राज्यातील 29 महापालिका आणि 394 नगरपालिकांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक महापालिकेला 3 कोटी तर प्रत्येक नगरपालिकेला 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रातील उत्कृष्ट शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुक्रमे 10 लाख, 7 लाख आणि 3 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Uddhav Thackeray paid homage at the memorial with his family

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *