उगांवच्या जवानाला जम्मुकाश्मिरात वीरमरण

निफाड: प्रतिनिधी 
 भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (३२) यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्यवावर असतांना वीरमरण आले असल्याची प्राथमिक माहिती कुटुंबीयांना फोनद्वारे मिळाली आहे.
निफाड तालुक्यातील उगांव येथील रहिवाशी उत्तम बाबुराव ढोमसे यांचे ते सुपूत्र आहेत. जनार्दन यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे उगांव येथे झाले होते. १२ वी नंतर जनार्दन हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्याआधी त्यांनी लातुर येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमीत प्रवेश घेतला होता. २००६-२००७ मध्ये सर्वप्रथम कच्छभोज त्रिपुरा आसाम आणि आता जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत होते. तीन वर्षानंतर त्यांची सेवा संपणार होती. त्यांचे वडील उत्तम बाबुराव ढोमसे व आई हिराबाई उत्तमराव ढोमसे हे शेती व्यवसायानिमित्त मरळगोई खुर्द येथे स्थलांतरीत झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा तसेच पत्नी रोहीणी, मुलगा पवन(वय वर्ष 8), मुलगी आरु (वय वर्ष २), भाऊ दिगंबर, चुलते व चुलती असा परिवार आहे. दरम्यान याबाबत स्थानिक प्रशासनाकडे अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही
▶️ राष्ट्रप्रेमासाठी‌ स्वत: चे जीवन समर्पित करु‌न आमच्या ढोमसे परिवारातील युवकाने वीरमरण पत्करुन भारत मातेच्या चरणी आपले आयुष्य समर्पित केले आहे त्यांच्या वीरमरणामुळे ढोमसे परिवार दु:खात बुडाला आहे
  साहेबराव ढोमसे
माजी सरपंच उगांव ता निफाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *