नाशिक: प्रतिनिधी
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 11 वाजता पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी स्वामीत्वकार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार, आमदार उपस्थित राहणार होते. मात्र काल रात्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असावा, असे बोलले जाते आहे.