नाशिक

दादा कोंडके यांच्या वेशात अनोखे आंदोलन

वृक्षतोडीविरोधात कलाकार सरसावले

पंचवटी : प्रतिनिधी
तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या प्रस्तावाविरोधात सुरू असलेल्या ‘तपोवन बचाव आंदोलना’ला आता कला-सांस्कृतिक क्षेत्रातूनही जोरदार पाठिंबा मिळत आहे. मूळचा मखमलाबादकर असलेला सिनेअभिनेता सोनू (लखन ) अहिरे यांनी दिवंगत विनोदी अभिनेते दादा कोंडके यांच्या वेषात साकारलेले अनोखे आंदोलन नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोनू अहिरे याने दादा कोंडके यांच्या लोकप्रिय शैलीत संवाद, हावभाव आणि विनोदाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. ‘झाडे वाचवा, तपोवन वाचवा’ हा संदेश त्यांनी प्रभावीपणे मांडत नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण केली. या आंदोलनात दिग्दर्शक कलीम शेख, दीनानाथ शुक्ला, कार्तिक अनिल, अनया खान यांच्यासह अनेक कलाकारांनी सक्रिय सहभाग घेतला. कलाकारांनी हातात फलक, घोषणाबाजी व संवादात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून वृक्षतोडीविरोधात आपला निषेध नोंदवला.
कलाकारांनी सांगितले की, तपोवन हे केवळ धार्मिक नव्हे, तर पर्यावरणीयदृष्ट्याही अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. येथे होणारी वृक्षतोड भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते. त्यामुळे प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे तपोवन बचावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

20 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

20 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

21 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

21 hours ago