नाशिक

येवल्यात बेमोसमी पावसाने गहू, कांदा पिकांचे नुकसान

येवला : प्रतिनिधी
येवला शहरासह तालुक्यातील अनेक भागात जोरदार वार्‍यासह बिगरमोसमी पावसामुळेे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतातील गहू, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
येवला शहरात मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान जोरदार पाऊस बरसला. अर्धातास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. तालुक्यातील अनेक भागात पाऊस बरसल्याने काढणीला आलेला गहू आडवा झाला असून, वार्‍यामुळे दाणे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. मुख्य पीक असलेल्या कांद्याची काढणी सुरू असतानाच पाऊस झाल्याने साठवणूक केलेला आणि शेतात असलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “अचानक आलेल्या पावसामुळे उभ्या गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक जमिनीला टेकल्याने आता उत्पादनात मोठी घट होईल,“ अशी माहिती येवला-बदापूर रोडवरील शेतकरी अशोक पवार यांनी दिली. सतत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. यातच आता मुंबई, ठाणे आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात झालेल्या पावसामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावत शेतकर्‍यांच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Unseasonal rains damage wheat, onion crops in Yeola

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago