शिवसेना प्रणित शिव कर्मचारी सेनेच्या युनियन फलकाचे अनावरण
सिडको: विशेष प्रतिनिधी
शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणेतून तसेच शिव कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये शिव कर्मचारी सेना संघटनेच्या कामगार युनियनची स्थापना करण्यात आली.
या अंतर्गत पी.एम.ई.ए. सोलर टेक सोल्यूशन्स लि., डी.एम. प्रिसीजन स्टॅम्पिंग कं., एम.डी. इंडस्ट्रीज (प्लांट नं. एच-२८) आणि एम.डी. ऑटो कम्पोनंट्स प्रा. लि. (प्लांट नं. ई-७३) या चार प्रमुख कंपन्यांमध्ये युनियनचे उदघाटन पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत शिव कर्मचारी सेना अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी यांनी कामगार बांधवांना संबोधित करत त्यांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने लढा देईल असे ठाम प्रतिपादन केले. तसेच, कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिव कर्मचारी सेना महाराष्ट्र सरचिटणीस विक्रम नागरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या विस्ताराची आगामी कार्ययोजना सादर करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या युनियनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी आशिष सुराशे, उपाध्यक्षपदी मेहराज नागरे, खजिनदारपदी सुनील बडे आणि सेक्रेटरीपदी रवींद्र पालवे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिव कर्मचारी सेना सचिव कोणार्क देसाई, शिवसेना सह-संपर्कप्रमुख राजू अण्णा लवटे, महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे, माजी नगरसेवक योगेश शेवरे, विभागप्रमुख नितीन अमृतकर, राहुल भुजबळ, कृपा मिश्रा, सार्थक नागरे, सचिंद्र मोरे, चव्हाणके, शुभम आदमाने, मेघराज नागरे, प्रवीण बडगुजर, दिनेश बडगुजर, प्रवीण सांगळे, भरत गुजर, भाऊसाहेब घुगे, गणेश काकड, चिन्मय काकड, विनोद पाटील यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कामगारांच्या हितासाठी शिव कर्मचारी सेना संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात अधिक व्यापक स्तरावर कार्य केले जाईल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…