Categories: नाशिक

जि.प.ची वेबसाइट अद्ययावत करणे सुरू

मनुष्यबळ कमी असल्याने काम संथगतीने

गांवकरी इम्पॅक्ट

नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर अपुरी माहिती, मूळ अधिकारी रुजू होऊनही साइटवर जुनेच प्रभारी, असे वृत्त दैनिक गांवकरीत दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत वेबसाइट अद्ययावत करण्यास सुरूवात केली असून मनुष्यबळ कमी पडत असल्याने काम संथगतीने सुरू असल्याचे समोर आले आहे.
मुख्यालयातील पदाधिकारी, पदांचा तपशील, योजना, उपक्रम, तसेच माहितीचा अधिकार आदी माहिती काही पूर्णस तर काही अपूर्ण स्थितीत आहे. त्यासोबत पंचायत समित्यांचे तालुक्याविषयी,नियंत्रणाची साखळी, राबविल्या जाणार्‍या योजना, प्रेक्षणिय स्थळे, संपर्क याविषयी माहिती उपलब्ध नाही.
त्र्यंंबकेश्वर, इगतपुरी, देवळा, नांदगाव, पेठ, सुरगाणा, मालेगाव, सिन्नर, बागलाण, चांदवड, निफाड या पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आणि सहायक गटविकास अधिकारी यांची नावे अपडेट असू,न बाकी महिती भरण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यालयातील महिला व बालविकास विभागाचे मूळ अधिकारी रुजू होऊनही प्रभारीचे नाव वेबसाइटवरून हटविण्यात आले नव्हते.आता वेबसाइटवर मूळ अधिकार्‍याचे नावे झळकली असून, पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकार्‍यांची नावे उपलब्ध असली, तरी त्यांचा संपर्क क्रमांक आणि इतर माहिती अद्याप भरलेली नाही.
नवीन इमारतीत सद्यःस्थितीत सीईओंच्या अखत्यारीतील विभाग स्थलांतरीत झाले असून, कामकाजास गेल्या सोमवारपासून (दि.17) सुरुवात झाली आहे. कारभार गतिमान व्हावा यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर जिल्हा परिषदेची माहिती दिलेली आहे. परंतु ही माहिती अपुरी तर आहेत. पण विभागाचे अधिकारी विभागात रुजू होऊनदेखील जुन्या प्रभारींचे नावे हटविण्यात आलेली नव्हती. दैनिक गांवकरीच्या वृत्ताची दखल घेतल्यानंतर वेबसाइट अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेबसाइट अद्ययावत करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ कमी असल्याने विलंब होत असल्याचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिक जिल्हा परिषदेची बेवसाइट अद्यावत करण्यात येत आहे.अजून माहिती भरण्याचे काम सुरू आहे. पाठपुरावा करून वेबसाइट अद्ययावत करण्यात येईल.
– महेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गावकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, 1 वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

20 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

20 hours ago