वाढोलीतील ग्रामसेवकाला एक
लाखाची लाच घेताना अटक
नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील ग्रामसेवकाला एक लाख चार हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अनिलकुमार सुपे (46) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून, त्यांनी वाढोली ता. त्र्यंबकेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत निलांबिका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटीच्या नावे वाढोली गावात विविध कामे केली होती. या कामाचे 2, 99776 रुपयांचे बिल ग्रामपंचायतीकडे बाकी होते.याबाबत तक्रारदाराने ग्रामसेवकाकडे या बिलाबाबत विचारणा केली असता बिल मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपये आणि यापूर्वीचे बिल मंजूर केले त्याची बक्षिसी म्हणून 70 हजार आणि सर्व बिलांचे ऑडिट करण्यासाठी चार हजार रुपये असे एक लाख चार हजार रुपयांची लाच ग्रामसेवक सुपे यांनी मागीतली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात केली होती. त्यानुसार काल दुपारी सापळा रचण्यात आला. त्यात ग्रामसेवक सुपे हे लाच घेताना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक नीलिमा डोळस, हवालदार संदीप हांडगे, प्रभाकर गवळी, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.