वाळवण जत्रा : दोनदिवसीय गृह उत्पादन प्रदर्शनाचे आजपासुन आयोजन

 

नाशिक :प्रतिनिधी
नवीन नाशिक येथील अर्थ नागरी सहकारी पतसंस्था, संय ोग बहुउद्देशीय संस्था आणि वंजारी सेवा संघ महाराष ्ट्र राज्य महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमान े स्थानिक महिला बचत गट, महिला गृह उद्योजिका, तसेच युवा उद्योजकांच्या गृह उत्पादनांना बाजारपेठ म िळावी व सहकारातून आर्थिक उन्नती साधावी, या हेतूने दोनदिवसीय वाळवण जत्रा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक् ष गोपाळ पाटील यांनी गुरुवारी पत्रकार
परिषदेत दिली. सावतानगर येथील स्वा.
सावरकर सभागृहात दि. ३ व ४ जून रोजी या वाळवण जत्रेचे आयोजन करण्यात आले अ सून, यात महिलांनी तयार केलेल्या वाळवणाच्या विविध पदार्थांचे प्रदर्शन आणि विक्री केली. जाणार आहे.
घरातील स्वयंपाक करणे, मुलांचे डब्बे, घरातील साफ-सफ ाई ही गृहिणींची काही केली तरी न टाळता येणारी कामे क ूनही आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी महिला बचत गटांच्या माध्यमातून सिध्द करीत आहेत. नोकरी न करताही कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यात महिला बचत गटातील सदस्यांचा वाटा खूपच महत्त्वा चा आहे, त्यामुळे महिलांना लघु, गृहउद्योगाच्या मा ध्यमातून आत्मनिर्भर बनवून त्यांचा आर्थिकस्तर उं चाविण्यासाठी रोजगार निर्मिती करून इतर महिलांचे सक ्षमीकरण करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमा तून केला जात
असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या प्रदर्शनात बचत गटांचे तीस स्टॉल राहणार असून, व ाळवणाचे घरगुती पदार्थ मिळणार असल्याने या संधीचा म ोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष युवराज पाटील, खजिनदार मंजूषा दराडे, संचालक विनायक शिंदे, राजश्री शिंदे आद ी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *