पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी वंचित’आघाडी मैदानात 

 

 

रतन बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल : चूरस वाढली

 

नाशिक : प्रतिनिधी

 

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्यावही शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघावर दीर्घकाळ भाजपाचे वर्चस्व राहिले.नंतर काँग्रेसने 2009 पासून आतापर्यंत या मतदार संघ आपल्याकडे कायम राखला आहे. बहुजन वंचित आघाडीने या निवडणुकीत उडी घेतल्याने आता आता तिरंगी सामना होणार यात शंका नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बनसोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सादर केला.यावेळी आघाडीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड,चित्राताई कुरे,जिल्हाध्यक्ष पवन पवार,नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे, गंगाधर अहिरे,बाळासाहेब शिंदे विश्वनाथ भालेराव,पंडित नेतावटे, विशाल पाडमुख,दीपक पगारे,चेतन गांगुर्डे,विनोद सोनकांबळे, उर्मिलाताई गायकवाड,चेतन जाधव,मंगेश पवार, चावदास भालेराव,विलास खरात आदी उपस्थित होते.

 

भाजप शिंदे गटाचा कारभार त्रस्त करणारा

राज्यातील भाजप व शिंदे गटाच्या सरकारला राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. यात मग अगदी ग्रामिण, शहरी भागातील तळागातील वर्गापासून ते शिक्षित गटातील सर्वच जन या सरकारला कंटाळ्ले आहे. त्यामुळे पदविधर निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार आहे. वंचितला माणनारा वर्ग या मतदारसंघात असल्याने त्याचा फायदा आम्हाला होणार आहे.
अविनाश शिंदे, (महानगरप्रमुख वंचित बहुजन आघाडी, नाशिक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *