ना.छगन भुजबळांविरुद्ध दिलेल्या इशाऱ्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांची धरपकड

ना.छगन भुजबळांविरुद्ध दिलेल्या इशाऱ्यानंतर

वंचितच्या कार्यकर्त्यांची धरपकड

महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांचा आरोप

नाशिक- दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पांडवलेणे परिसरातील बौद्ध स्मारकात संपन्न होत असलेल्या बोधीवृक्ष फांदी रोपणाच्या कार्यक्रमाच्यावेळी ना. छगन भुजबळ यांना बोधी फांदीस हात लावू देणार नाही, असा इशारा बहुजन वंचित आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्यानंतर पोलीस यंत्रनेकडून वंचित च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
1987 साली दलित बांधव मुंबईच्या हुतात्मा स्मारकात जमले असताना त्यावेळी स्मारक परिसर छगन भुजबळ यांनी नंतर गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घेतले होते. त्या घटनेची सांगड घालत जातीयवादी असलेले ना.भुजबळ यांना बोधी फांदीस हात लावण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यांनी आधी बहुजन समाजाची माफी मागावी आणि नंतरच बोधी फांदीस हात लावावा. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्याच्या क्लिप्स सर्व दूर व्हायरल झाल्यानंतर बोधीवृक्ष फांदीरोपण कार्यक्रमावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर 149 अंतर्गतच्या नोटिसा बजावल्या आहेत.तसेच काहींची धरपकडही सुरू केल्याचा आरोप अविनाश शिंदे यांनी केला आहे. बळाचा वापर करून पोलीस बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असून हे लोकशाहीच्यादृष्टीने घातक असल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कोणत्याही दबावाला घाबरणार नाहीत आणि गनिमी काव्याने आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू असा ईशारा वंचित चे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *