1882 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीतून ‘वंदे मातरम्’ गीत जगासमोर आणले. त्या काळात समाज निराशा, आर्थिकदृष्ट्या पीडित आणि मानसिकदृष्ट्या गुलामगिरीच्या ओझ्याखाली दबलेला होता. या गीताने भारतीयांच्या अंतःकरणात सुप्त असलेली राष्ट्रभक्ती जागृत केली. ‘वंदे मातरम्’ हे संस्कृत प्रचूर बंगाली भाषेत आहे. तरीही देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे वेगळेपण जाणवत नाही; कारण देशातील जी व्यक्ती या मातीशी जोडलेली आहे आणि या मातीप्रतिची कृतज्ञता या गीतातून व्यक्त होत आहे. भारतीय राजकारणात आणि समाजमनात ‘वंदे मातरम्’ या शब्दांना केवळ अक्षरांचे संकलन न मानता एक जिवंत ऊर्जेचा स्त्रोत मानले
गेले आहे. क्रांतिकारकांसाठी ‘वंदे मातरम्’ हा फासावर जाताना दिलेला मंत्र होता. तो त्यांच्या रक्तात होता. केवळ ओठांवरच नाही तर तो जगण्या-मरण्याचा आधार होता. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू किंवा मदनलाल धिंग्रा फासाच्या दोराकडे जाताना त्यांच्या ओठावर ‘वंदे मातरम्’चाच जयघोष असायचा. बंगाल फाळणीच्या वेळी (वर्ष 1905) ब्रिटिशांनी ‘वंदे मातरम्’ घोषणेवर बंदी घातली होती. तरी अंगावर पडणार्या प्रत्येक लाठीसमवेत क्रांतिकारकांचा आवाज अधिक बुलंद होत असे. काँग्रेस सरकार, नेहरू यांनी मुसलमानांच्या लांगूलचालनामुळे आणि क्रांतिकारकांविषयीच्या द्वेषामुळे या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला नाही. ‘वंदे मातरम्’ नीट म्हणता येत नाही, त्याला चाल लावता येत नाही, असे सांगून विरोध केला.
पंडित विष्णूबुवा दिगंबर पलुसकर यांनी त्याला छान चाल लावली आणि ती देशासमोर मांडली, पण हिंदूद्वेषी नेहरूंनी विरोध केला.
मुसलमान नेहमीच ‘वंदे मातरम्’ला विरोध करत राहिले आणि आजही करत आहेत आणि त्यांची बाजू घेणारे समाजवादी पक्षासारख्या पक्षांनीही विरोध केला आहे. केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यक्रम यामध्ये संपूर्ण गीत जे तीन मिनिटे दहा सेकंदांचे आहे, ते म्हणणे अनिवार्य केले आहे आणि तेही राष्ट्रगीत जन-गण-मनच्या पूर्वी. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसच्या अधिवेशनात आणि अन्य सभांच्या वेळी ‘वंदे मातरम्’ गायले जात होते, मात्र त्यामध्ये एका कडव्यात श्री दुर्गादेवीचा उल्लेख असल्याने मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातील, या कारणाने इतर कडवी न गाण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेतला गेला. याला काहींनी विरोध केला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हाच धागा पकडून आजही विरोध होत आहे. हिंदुत्वाच्या प्रचारासाठी हा प्रयत्न आहे, असे असदुद्दिन ओवेसी म्हणतात. तर धार्मिक किंवा सांस्कृतिक दबाव निर्माण करणे चुकीचे आहे, असे समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव म्हणतात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा झाली होती, पण चर्चा न करता विरोधकांनी गोंधळच घातला होता आणि त्यामुळे वारंवार संसदेचे कामकाज स्थगित करावे लागले होते. 7 नोव्हेंबर 2025 ला ‘वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने केंद्र शासनाने हे म्हणणे बंधनकारक केले आहे. ध्वजवंदना, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करणे यापूर्वी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ वाजवले जाणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रगीत ‘जन-गण- मन’ आणि राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ एकत्र म्हणायचे असल्यास ‘वंदे मातरम्’ आधी आणि त्यानंतर जन-गण-मन’ गायले जाईल. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि घटनात्मक संस्था यांना यासंबंधीचे निर्देश प्रसारित करण्यात
आले आहे. 150 वर्षांनंतर का होईना या राष्ट्रीय गीताला योग्य सन्मान मिळाला आहे आणि त्याचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे
कर्तव्य आहे.
Vande Mataram