प्रभाग क्र.9 मध्ये विकासाची गंगा
नाशिक :अश्विनी पांडे
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ चे माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी त्यांच्या चार टर्मच्या कारकीर्दीत आपल्या प्रभागात वेगवेगळी विकासकामे करत नागरिकांची मने जिंकली आहेत. दिनकर पाटील हे याच प्रभागातून नाशिक महानगरपालिकेत चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. हीच त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचे प्रभागातील नागरिक सांगतात. काँग्रेस शहर अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. भाजपात आल्यानंतरही आपल्या कामाने नवीन पक्षात ही आपली वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळेच प्रभागातील अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी थेट भाजपाचे वरिष्ठ नेते आले होते.
गेल्या पाच वर्षांत कोरोना काळ असतानाही त्यांच्या प्रभागात झालेली विकासकामे ही डोळे दीपवणारी आहेत. येत्या काळात नाशिक लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. नगरसेवक कारकिर्दीत केलेल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यामुळे दिनकर अण्णा पाटील यांनी होऊ घातलेल्या लोकसभेचे नेतृत्व करावे, अशी इच्छा प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहेत. तर नाशिकच्या राजकीय क्षेत्रात दिनकर अण्णा पाटील यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपा नाशिक लोकसभेचे उमेदवार दिनकर पाटील ठरणार का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विकासकामे
शाळा, क्रीडांगण, हॉस्पिटल, व्यायामशाळा, मंदिरे, जलकुंभ, उद्याने यासारखी विकासकामे करत आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळेच दिनकर अण्णा पाटील यांचा प्रभागातच नाही तर नाशिक शहराच्या दबदबा आहे. राजकारणात दिनकर अण्णा पाटील यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी लता दिनकर पाटील यादेखील दोन टर्म नगरसेविका राहिल्या आहेत. तर त्यांचे पुत्र अमोल पाटील ही युवा फाउंडेशनच्या माध्यमातून असतात.
सामाजिक कार्यात अग्रेसर
प्रभागातील पिण्याच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दिनकर अण्णा पाटील यांनी ठिकठिकाणी जलकुंभ उभारले. आणि या जलकुंभांना समाजातील आदर्श महापुरुषांची नावे दिली आहेत. श्री स्वामी समर्थ जलकुंभ श्रमिकनगर, कै. वसंतराव फुलसिंग नाईक जलकुंभ शिवाजीनगर,लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे जलकुंभ ध्रुवनगर, अण्णा भाऊ साठे जलकुंभ शिवाजीनगर उभारत प्रभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आहे.विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे इतकेच नाही तर पाण्यासह शिक्षणातही आपल्या प्रभागातील शिक्षण मिळावे यासाठी अत्याधुनिक शाळा उभारल्या आहेत. शाळेप्रमाणेच या प्रभागात तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी व्यायामशाळेचीही उभारणी करण्यात आली आहे. शिवछत्रपती व्यायामशाळा, संभाजीराजे व्यायामशाळा कै. वसंतराव नाईक व्यायामशाळेसह तब्बल ४०ग्रीन जिम उभारत प्रभागातील नागरिकांच्या सुदृढतेची काळजी घेतली आहे. व्यायामशाळेसह आपल्या प्रभागात उद्यान व उद्यानांनादेखील महापुरुषांची नावे देत सर्व जातीधर्मातील नागरिकांना एकसंघ बांधून ठेवण्याचे कार्य अण्णांनी केले आहे. यात राजमाता जिजाऊ उद्यान, महाराणा प्रताप उद्यान, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उद्यान, महात्मा जोतिबा फुले उद्यान, संत गाडगे महाराज उद्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि हॉल,माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नरेंद्राचार्य महाराज उद्यान, ज्येष्ठ नाटककार कै. वसंतराव कानेटकर उद्यान यांसारखी उद्याने उभारली आहेत. याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही अण्णांनी आपल्या प्रभागात विविध अशी कार्य केली आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मॅटर्निटी व डिस्पेन्सरी हॉस्पिटल उभारले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा या मोफत मिळतात.
याचप्रमाणे क्रीडांगणही उभारण्यात प्रभागात आले आहे. राष्ट्रसंत तुकाराम महाराज क्रीडांगण उभारले आहे. या माध्यमातून जॉगिंग ट्रॅक, बास्केटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट यांसारख्या खेळांसाठी मैदाने उपलब्ध असून, या ठिकाणी सीसीटीव्ही, म्युझिक सिस्टिम, ग्रीन जिम आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील खेळाडूंना आपल्या कलागुणांना वाव देण्यास संधी मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कम्युनिटी हॉलची निर्मिती केली. धार्मिक संस्कार होण्यासाठी प्रभागात श्रीमद्भगवत कथा, सागर, रामायण कथा, हरिनाम सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अण्णांच्या वतीने करण्यात येते. यात सामाजिक एकता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य कुस्त्यांच्या दंगलींचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. नागरिकांना आरोग्यसेवेसाठी रुग्णवाहिका सेवा आणि शववाहिका सेवा दिली आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रभागात शंभर मंदिरांची आणि संस्कार केंद्रांची उभारणीदेखील केली आहे. यामुळे आध्यात्मिक कार्यात भर पडत आहे. त्याचप्रमाणे महिलांना देखील मदत व्हावी यासाठी महिला बचत गटांनादेखील अण्णांच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य करण्यात येते. तरुणांच्या रोजगारांसाठी शिवछत्रपती भाजी मार्केट, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्केटची उभारणी दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. भाजीपाल्यासह वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नाही व कर्ता पुरुष हायात नाही अशा नागरिकांना दरमही मोफत धान्य पाटील यांच्या माध्यमातून दिले जाते. प्रभागात औषध फवारणी, मोफत अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्ट, दर शनिवारी मोफत नेत्रतपासणी यांसारखे शिबिर राबवण्यात येतात. त्याचप्रमाणे प्रभागात प्रत्यक्ष शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आधार कार्ड शिबिर, श्रमकार्ड शिबिर अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात येते. प्रभाग क्रमांक ९ चा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माजी नगरसेवक तथा माजी सभागृहनेते दिनकर अण्णा पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या जोमात सर्वांना एकत्रित घेत विकासकामे करण्यात येतात.
कोरोनाकाळातील कार्य
कोरोनाकाळात प्रभागातील नागरिकांना वेळोवेळी विविध प्रकारची मदत आणि सहकार्य करण्यात आले. यात प्रभागातील नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळावा यासाठी माजी नगरसेवक दिनकर पाटील व माजी नगरसेविका लताबाई दिनकर पाटील व युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रभागातील वीस हजार घरांमध्ये मोफत भाजीपाला वाटप करण्याचा संकल्प केला होता. गंगापूर, गोवर्धन, सोमेश्वर मंदिर परिसर, शिवाजीनगर, ध्रुवनगर, धर्माजी कॉलनी, श्रमिकनगर, अशोकनगर, संभाजीनगर, वास्तूनगर, स्वामी विवेकानंदनगर, राधाकृष्णनगर या भागातील सुमारे २९ हजार ४४० घरांमध्ये भाजीपाला वाटप करण्यात आला.