वसुबारस

वसुबारस!

,,,,,, मृणाल पाटील

आपल्या भारतीय संस्कृतीत असलेला महान सण दिवाळी. त्याचा पहिला दिवस म्हणजे वासू बरास. यालाच गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात. आपलं राज्य, देश कृषीप्रधान. जो शेतकरी आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो तो अन्नदाता. गोवत्स द्वादशीच महत्त्व या आमच्या शेतकरी बांधवांसाठी अधिक आहे, गोमाता अर्थात गायी बाबत कृतज्ञता या दिवशी व्यक्त करीत असतात. प्रेम भावनेचा हा आविष्कार जगात कुठेच बघायला मिळणार नाही इतकं हे शेतकरी आणि गायी वासराच अनोखं प्रेम, नात आहे.
ज्या शेतीवर आपण परिश्रम करतो त्यासाठी बैलाची माता असणाऱ्या या गोमातेला शेतकरी लक्ष्मी मानतात आणि गाय वासराची पूजा करतात. या गायीच्या शेण आणि गोमूत्र यांचा शेती विकसित करण्यासाठी उपयोग होत असल्याने या गोमातेविषयी कृतद्यता व्यक्त n करणे म्हणजे अन्यायकारकच ठरेल. म्हणून शेतकऱ्यांना या सणाच्या सुरुवातीचा दिवस हा खऱ्या अर्थाने या शेतकरी राजासाठी दिवाळी असते. दिवाळी म्हणजे आनंद, पण शेतकरी ती ज्या प्रकारे साजरी करतो ते अतिशय महत्वाचे आहे. गाय आणि वासराची पूजा करून दिवाळी सुरू होत असते. आपल्या संस्कृतीत ज्या परंपरा आहेत त्या अतिशय दूरदृष्टी ठेवून तयार केल्या आहेत.
गायीचं महत्त्व केवळ अध्यात्मिक दृष्ट्या विशिष्ट हेतूने अधोरेखित करणे चुकीचे आहे. गायीच्या शेणाचे आणि गोमुत्रचे महत्व वैज्ञानिक दृष्ट्या आधुनिक काळात सर्वांनाच पटू लागले आहे.सेंद्रिय शेतीचे प्रयोग पुन्हा सुरू झाले आहेत,वैद्यकीय कारणांसाठी त्यांचा उपयोग होत आहे. दुग्ध उत्पादनात आपण भरारी घेत आहोत.
आता तर साबण, उदबत्ती,धूप व अन्य वस्तूंची निर्मिती यापासून केली जाऊ लागली आहे.
भूमातेच्या रक्षणासाठी तिला सुपीक बनवण्यासाठी गायीच्या शेणात जे गुणधर्म आहेत ते अन्य कशात नाहीत. रासायनिक खतांमुळे ही जमीन नापीक बनते. पण गाय, वासरू, म्हैस,बैल, शेळी, मेंढर यांच्या शेणापासून जमीन सुपीक होते.या सर्वांना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या घरात खूप मोठे स्थान आहेच पण तेवढाच मान देखील आहे. किंबहुना हा सण आणि क्षण शेतकरी बांधवांसाठी आज खूप महत्त्वाचा मानला जातो. जी गोमाता आपल्या वर्षभराच्या उत्पांनची सोय करते तिच्या विषयीची ही अशी कृतज्ञता आजच्या दिवशी व्यक्त करणे हे कित्येक वर्षापासून सुरू आहे. यावरूनच वसू बरसचे महत्त्व लक्षात येते. आश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीला हा सण साजरा करतात.
वसु म्हणजे सूर्य, धन,कुबेर! ही धनाची कुबेराची पूजा असते. शेतकरी राजासाठी गाय वासरू हे धन आहे. गाय ही हिंदू संस्कृतीत पवित्र मानली जाते. यानंतर दिवाळीतील इतर सण साजरे होतात. जसे, नरक चतुर्दशी, बलीप्रतिपदा,लक्ष्मीपूजन,पाडवा आणि भाऊबीज. पण आपल्या संस्कृतीच वैशिष्ट्य हे आहे की आधी जो आपले पोट भरतो, त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवाळी हा मोठा सण ज्यांच्यामुळे हे आनंदाचे दिवस बघायला मिळता आहेत त्यांना न विसरता करण्याची ही परंपरा उदारता, विशालता आणि कृतज्ञता यांचं देखणं प्रतीक आहे. खाल्या मिठाला खऱ्या अर्थाने जागणे हेच असावे बहुदा! येथे उपकार, अहंकार, परतफेड अशा वृत्तीला अजिबात स्थान नसत. गाय ही आपली आई आणि तीच वासरू देखील पुढे शेती कामात मदत करणार, ही विशाल जाणीव ठेवूनच शेतकरी हा दिवस आनंदाने साजरा करतात.
खर तर पावसाळा सुरू होण्याअगोदरच शेतीची कामे सुरू झालेली असतात. अधिकाधिक उत्पन्न मिळावे व परिवार, आपला देश त्यातून समृद्ध व्हावा ही महान भावना शेतकऱ्यांची असते. तो केवळ शेतात स्वतःसाठी कधीच राबत नाही, ऊन- पाऊस झेलत, अपार कष्ट करून शेती बहरते तेव्हा त्यातून येणार पीक व उत्पन्न म्हणजे आपल्या जगण्याची सोय. ते उत्पन्न करण्यात जगाच्या पाठीवर माणुसकीचा आदर्श उभा करणारी आहे हे मान्य करावेच लागेल.ह्या वासू बाराच्या अपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *