आस्वाद

वटपौर्णिमा

– रचना चिंतावार
सावित्रीच्या सदगुणांचा वारसा
वटवृक्ष पूजा भारताची
आदी दैवत संस्कृती
वटवृक्ष महावृक्ष
पूजतात आदिशक्ती
वड या वृक्षाला भारतीय संस्कृतीत आस्थेचे स्थान आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवसाला धार्मिक महत्त्व आहे. वटपौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा असे ही म्हणतात. या दिवशी शुद्ध पौर्णिमेपर्यंत सुवासिनी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात.
या दिवशी वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळविले. या दिवशी सुवासिनी स्त्रिया ब्रह्मसावित्रीचे पूजन करतात. आपल्या भारतीय संस्कृतीत पतिव्रता स्त्रियांना फार महत्त्व आहे. स्त्रियांमध्ये सावित्रीचे स्थान फार वरचे स्थान आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून सात वेळा झाडाला सूत बांधतात. पुढील सात जन्म आपल्याला हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करतात. सावित्रीने यमाशी आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्यासाठी असाध्य गोष्ट साध्य करून आपल्या पतीचे सत्यवानचे प्राण परत मिळविले. श्रद्धा आणि निष्ठा कष्टाने वापरून अशक्य गोष्ट शक्य केली. म्हणून वटपौर्णिमेला सर्व महिला सुंदर नटून-थटून पूजेचे सुंदर ताट सजवून पूजा करतात. एकमेकांना हळदी-कुंकू देऊन वाण देऊन ओटी भरतात.
सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली बसवून मिळविले होते. पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाला विशिष्ट महत्त्व असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हाही पूजेचा हेतू असतो. वडाचे झाड दीर्घायु प्राणवायूचा अध्यक्ष मानतात.
प्राणिमात्रा छत्रछाया
मुले प्रारंब्या खेळती
प्राणवायू देती साथ
वाटसरू लाभे शांती
सावित्रीने आंतरिक गुणाची पारख करून निवडलेल्या वरास आई-वडील आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली. व पतीचे प्राण वाचविण्याचे अवघड काम चिकाटीने आणि उदंड इच्छाशक्तीने चार्तुयाने करून दाखविले. सावित्रीचे आपल्या पतीविषयी प्रेम खरे ठरले आणि प्रार्थना केली.
सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिनी
तेन सत्येन भां पाहि दुःख संसार सागरात
वट मुले स्थितो ब्रह्मा वटामध्ये जनार्दन:
वटाग्रे तू शिवो देवः सावित्री वटसावित्री.

Vat Purnima

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago