देवळाली कॅम्प : वार्ताहर
भगूर येथील बिटको महाविद्यालयाचा छात्र सेना विभागाचा विद्यार्थी वेदांत संग्राम गायकवाड याची नवी दिल्ली येथे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणार्या संचालनासाठी निवड झाली आहे. वेदांत संग्राम गायकवाड हा बिटको कॉलेज एस वाय कॉमर्सचा विद्यार्थी आहे. यापूर्वी देखील त्याने दिल्ली आजादी का अमृत महोत्सव, एनसीसीद्वारे विशेष राष्ट्रीय एकात्मता शिबिर, विजय श्रुंखाला और संस्कृती का महासंगम मेग! इव्हेंटमध्ये नेतृत्व केले आहे. नवी दिल्लीतील शिबिरात सर्व राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर 22 भाषेतील गाणेही सादर केले होते. प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी व कॉलेजचे शिक्षक शिक्षिका आदींनी वेदांत गायकवाड याचे अभिनंदन केले.