नाशिक : प्रतिनिधी
महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नाशिक, दक्षिक्षरम्नाय श्री जगदगुरु शंकराचार्य महासंस्थान शृंगेरी, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्व विद्यालय रामटेक, नागपूर आणि वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन विभाग ऑरो विश्व विद्यालय, सूरत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद वाक्यार्थ सभा व राष्ट्रीय वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दिनांक 13 रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे.
गोपाल मंगल कार्यालय सरदार चौक, पंचवटी येथे या समारंभाचे उदघाटन होणा आहे. दिनांक 14 रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रीय वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण सोहळा कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह गंगापूर नाका येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन नागपूरच्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्व विद्यालय रामटेकचे कुलगुरु डॉ. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते आणि पंडीतराज वेदशास्त्र संपन्न गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी वाराणसी यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी 4 वाजता वैदिक संहिता व जनसंज्ञापन व संतांची वेदनिष्ठा या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात प्रा. हरे राम त्रिपाठी, प्रमोद शास्त्री कुलकर्णी, स्मार्त चुडामणी शांताराम भानोसे हे सहभागी होणार आहेत. शुक्रवारी दिनांक 14 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळात चतुर्वेद पठण व वाक्यर्थ सभा होणार आहे. या सभेत वेदाचार्य गणेश्वर शास्त्री, मधुसुदन पेंना, प्रमोद शास्त्री कुलकर्णी, प्रसाद गोखले, राजेश्वर शास्त्री देशमुख, संदीप जोशी, प्रतिक जोशी, रामचंद्र टाकळकर, सौरभ कुलकर्णी सहभागी होतील. दुपारी 2 वाजता ज्ञानेश्वरीतील वैदिक सूत्रे व जनसंवाद सभा होणार आहे. धर्मभूषण गौरीशंकरजी बंगळुरू यांच्या स्मरणार्थ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सन्मान सोहळा सायंकाळी 5 वाजता दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वेदाचार्य रवींद्र पैठणे, हभप दत्तात्रेय पैठणे, गोविंद पैठणे, रामगोपाल अय्यर, रामगोपाल अय्यर, वेदमूर्ती हरिष जोशी यांनी केले आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…