इगतपुरी आश्रमशाळेतील प्रकार, दोन विद्यार्थी गंभीर
इगतपुरी : प्रतिनिधी
शहरातील मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून किंवा पाण्यातून विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, उलटया होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थी अत्यावस्थ असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच चार विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करत असून, एवढी मोठी घटना घडूनही इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप इंगोले व भरारी पथक अधीक्षिका डॉ. स्वरूपा देवरे मात्र गैरहजर असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
इगतपुरी शहरात अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणार्या संस्थां आहे. या विद्यालयात 120 विद्यार्थी असून, मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील 8 विद्यार्थ्यांना उलटयाचा त्रास सुरू झाला. यामुळे या विद्यार्थ्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दोन दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. चार विद्यार्थ्यांवर येथे उपचार सुरू आहेत. हर्षल गणेश भोईर, (23, रा. भिवंडी, जि. ठाणे) व मोहम्मद जुबेर शेख, (11 रा. नाशिक) या दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. प्रथमेश बुवा, (17) व देवेंद्र कुरुंगे (15) या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला पाठवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी खालेल्या अन्नाचे नमुने घेण्यात आले असून, या घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह पुढील उत्तरीय तपासणी साठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. ग्रामीण रुग्णालयात पोलीस उप अधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस, निरीक्षक वसंत पथवे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, नायब तहसीलदार प्रवीण गुंडाळे, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे यांच्यासह शहरातील विविध पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी पावसाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…