नाशिक

पाऊस, पितृपक्षामुळे भाजीपाला कडाडला

किचन बजेट कोलमडले; महागाईमुळे डाळही शिजेना

नाशिक ः प्रतिनिधी
पावसाने गेल्या आठवड्यापासून संततधार लावल्याने भाजीपाला आवकेत घट झाली आहे. गौरी-गणपतीत
भाज्यांचे दर काहीसे स्थिर असले, तरी आता पितृपक्ष पंधरवड्यात पितरांना नैवेद्यासाठी लागणार्‍या भाज्यांचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सततचा पाऊस व पितृपक्षात ठरावीक भाज्यांंना मागणी वाढण्याची शक्यता आहे.
मेथी, गवार, कारले व शेवगा आदींचे भाव वाढले असून, पालक, शेपू, कांदापात या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने बाजारात भाज्यांंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गौरी-गणपतीसाठी 16, 21 भाज्यांना मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दर वाढण्याची शक्यता होती; परंतु दरवाढ न झाल्याने गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला होता. हिरवी मिरची किंवा इतर भाज्यांची आवक जास्त झाल्यास दर घसरतात, तर आवक कमी झाल्यास दर वाढतात. पितृपक्ष पंधरवड्यात मेथी, गवार, कारले, भेंडी, डांगर यांंच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या दिवसांत या भाज्यांच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

असे आहेत दर ः

मेथी- 25 ते 30 रुपये जुडी, कारले- 30 ते 40 रुपये किलो, गवार- 70 ते 80 रुपये, गावठी गवार- 100 रुपये किलो, डांगर- 15 ते 20 रुपये, ढोबळी मिरची- 40 ते 50, कोबी- 10 ते 15 रुपये गड्डा, फ्लॉवर- 15 ते 25 रुपये, आले- 30 ते 60 रुपये किलो, बटाटे- 25 ते 30 रुपये, टोमॅटो- 20 ते 25 रुपये किलो, गिलके- 50 रुपये किलो, दोडके- 60 रुपये किलो, घेवडा- 50 रुपये किलो, वाल- 50 ते 60 रुपये किलो, हिरवी मिरची- 50 ते 60 रुपये किलो, शेवगा- 70 ते 80 रुपये किलो, कोथिंबीर- 10 ते 30 रुपये जुडी, पालक, शेपू, कांदापात- 10 ते 30 रुपये जुडी.

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago