एकजण अटकेत; सात ते आठ संशयित फरार
सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेखानगर परिसरात गुरुवारी (दि. 29) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांचा वापर करून घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी अंबड पोलिसांनी कृष्णा दोंदे ऊर्फ केडी याला ताब्यात घेतले आहे. इतर सात ते आठ संशयित अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल शामराव जाधव यांचा भाचा आणि कृष्णा दोंदे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादाच्या रागातून टोळक्याने धारदार शस्त्रे हातात घेऊन लेखानगर परिसरात दहशत माजवली आणि घरासमोर उभ्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपासादरम्यान कृष्णा दोंदे याला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अंबड पोलीस हद्दीत गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्रे हातात घेऊन वाहनांची तोडफोड आणि नागरिकांवर हल्ल्याचे प्रकार घडत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. काही ठिकाणी अल्पवयीन गुन्हेगारांकडूनही कोयता, तलवार यांसारखी शस्त्रे वापरून दहशत माजवली जात असल्याचे दिसले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनंतर ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
यापूर्वी हनुमान चौक परिसरात चारचाकी वाहनांची तोडफोड आणि कामटवाडे परिसरात टोळक्याने नागरिकांवर हल्ल्याचे प्रकार घडले होते. सातत्याने घडणार्या अशा घटना नागरिकांमध्ये संताप निर्माण करीत असून, समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे. घटनेवेळी हवेत गोळीबार झाल्याची चर्चा होत असली तरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी स्पष्ट केले की, घटनास्थळी कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.
Vehicles parked in front of houses vandalized with sharp weapons in Lekhanagar area
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…