नाशिक : वार्ताहर
काठेगल्ली धवलगिरी सोसायटी , शंकर नगर परिसरात बिल्डिंगच्या पार्किंग रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चारचाकी वाहनांची मध्यरात्री टवाळखोरांकडून तोडफोड करत काचा फोडण्यात आल्या. या घटनेनंतर तातडीने भद्रकाली पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपासचक्रे फिरवत प्रकरणी तीन संशयितांना तपोवनातून ताब्यात घेतले.
रवींद्र शाळेजवळील बरखाबहार सोसायटीमध्ये राहत असलेले सौरभ मराठे यांचे चारचाकी वाहन क्रमांक
(एम एच 04 जीयु 8324), रवींद्र शाळेसमोर लावण्यात आलेली मुर्तजा अत्तरवाला यांची (एमएच 48 पी 0716,) धवलगिरी सोसायटी परिसरातील सीमा पेठकर यांच्या घरासमोरील चारचाकी (एमएच 15 जीएस 5510) व शंकर नगर परिसरातील सिद्धेश भडके यांची (एमएच 15 डीस 2805) हे चारचाकी वाहने टवाळखोरांनी रात्री 2 वाजेच्या सुमारास दुचाकीवर ट्रिपल शीट येत थेट वाहनांच्या काचा फोडत हैदास घातला. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, पोलिस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार आदींनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरु केला. परिसरातील दुकानामधील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु करत. प्रकरणी संशयित नीलेश पवार, सुमीत पगारे, विकी जावरे या टवाळखोरांच्या मुसळ्या आवळत तपोवन परिसरातून अटक केली. पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत.