नाशिक

काठे गल्ली परिसरात वाहनांची तोडफोड

 

 

 

नाशिक : वार्ताहर

 

काठेगल्ली धवलगिरी सोसायटी ,  शंकर नगर परिसरात बिल्डिंगच्या  पार्किंग  रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चारचाकी वाहनांची  मध्यरात्री टवाळखोरांकडून तोडफोड करत काचा फोडण्यात आल्या. या घटनेनंतर तातडीने भद्रकाली पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपासचक्रे फिरवत प्रकरणी तीन संशयितांना तपोवनातून ताब्यात घेतले.

 

रवींद्र शाळेजवळील बरखाबहार सोसायटीमध्ये राहत असलेले सौरभ मराठे यांचे चारचाकी वाहन क्रमांक

 

(एम एच 04 जीयु 8324), रवींद्र शाळेसमोर लावण्यात आलेली मुर्तजा अत्तरवाला यांची (एमएच 48 पी 0716,) धवलगिरी सोसायटी परिसरातील सीमा पेठकर यांच्या घरासमोरील चारचाकी (एमएच 15 जीएस 5510) व शंकर नगर परिसरातील सिद्धेश भडके यांची (एमएच 15 डीस 2805) हे चारचाकी वाहने टवाळखोरांनी रात्री 2 वाजेच्या सुमारास दुचाकीवर ट्रिपल शीट येत थेट वाहनांच्या काचा फोडत हैदास घातला.  भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, पोलिस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार आदींनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरु केला. परिसरातील दुकानामधील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु करत.  प्रकरणी संशयित नीलेश पवार, सुमीत पगारे, विकी जावरे या टवाळखोरांच्या मुसळ्या आवळत तपोवन परिसरातून अटक केली. पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत.

 

 

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 day ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 day ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago