नाशिक

अंबासनला वीजपेटीत आढळला विषारी नाग

दिवसा वीजपुरवठ्याची शेतकर्‍यांची मागणी

नामपूर : वार्ताहर
अंबासन (ता. बागलाण) येथील सारदे शिवारातील शेतकरी विलास वामन कोर यांच्या शेतातील वीजपंपाच्या पेटीत विषारी नाग अडकल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास उघड झाली.
मोसम खोर्‍यात रब्बी हंगामाची जोरदार तयारी सुरू असून, कांदा लागवड, गहू, हरभर्‍याला पाणी भरणे चालू आहे. नामपूर परिसरात शेतीला रात्री अकरापासून तर पहाटे सहापर्यंत वीज असते. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी बांधव दररोज रात्री अकराला वीजपंप चालू करण्यासाठी वीजपेटी जवळ जातात. अंबासन येथील शेतकरी विलास कोर सोमवारी अकराला जेव्हा आपला वीजपंप चालू करण्यासाठी पेटीजवळ गेले असता त्यांना भयंकर नऊ फुटांचा नाग पेटीत अडकल्याचे दिसले.
सुदैवाने त्याचे डोके पेटीत अडकल्यामुळे शेतकर्‍याला डंख मारता आला नाही. यावेळी आजूबाजूला आरडाओरडा करूनही कोणी न आल्यामुळे दुसर्‍या दिवशी पहाटे पेटीतून नागाला बाहेर काढण्यात आले. शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, वीज कंपनीचे अधिकारी याबाबत काहीच भूमिका घेत नसल्याची संतप्त भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. शेतकर्‍यांचे मरण हेच सरकारचे धोरण असल्याचे टीका शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रवीण अहिरे, अंताजी कोर, विठ्ठल महाजन, राजीव सावंत, बबलू सावंत, बिपिन सावंत, त्र्यंबक खैरनार यांनी केली आहे.

रात्री पिकांना पाणी देताना शेतकरी बांधवांची मोठी कसरत होत आहे. अंबासनच्या सौरऊर्जा प्रकल्पातून नामपूर सबस्टेशनला वीज आणण्याबाबत पुढील कार्यवाही सुरू असून, अजून आठ दिवसांत याबाबत अंतिम तोडगा निघेल. शेतकर्‍यांनी काही दिवस संयम ठेवावा.
-भूषण जगताप, उपमुख्य कार्यकारी अभियंता, नामपूर

Venomous snake found in electrical box in Ambasan

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago