विश्व शांती वैदिक महायज्ञाचे रविवारी आयोजन*
*तयारी झाली पूर्ण, भाविकांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक सज्ज*
नाशिक ः प्रतिनिधी
नाशिकच्या पुण्यभुमीत भव्य दिव्य धार्मिक सोहळा होणार आहे. सद्गुरु सदाफलदेव १००१ कुण्डिय विश्व-शांती वैदिक महायज्ञ आणि विहंगम योग संत समागम या *अध्यात्मिक सोहळ्याची ) संपूर्ण तयारी झालेली आहे. या सोहळयासाठी *येणार्या* भाविकांचे स्वागत करण्यासाठी सर्व स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. येत्या शनिवारी (दि.४ फेब्रुवारी) विहंगम योग संत समागम आणि रविवारी (दि.५ फेब्रुवारी) विश्व शांती वैदिक महायज्ञ त्र्यंबकरोड जवळील ठक्कर डोम येथे पार पडणार असल्याची माहिती सद्गुरु सदाफल देव विहंगम योग संस्थानचे आंतरराष्ट्रीय संत श्री किशनलाल शर्मा, प्रमुख आयोजक श्री. योगेश पाटील (गडाख), श्री. विवेक पाटील (गडाख), श्री. जयंत होनराव यांनी दिली आहे.
*अध्यात्मिक सोहळ्याविषयी* अधिक माहिती देतांना विवेक पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून या *अध्यात्मिक सोहळ्याची* तयारी सुरु होती. *नुकतेच* सभामंडपाचा भुमिपुजन समारंभ पार पडला. उत्सवाच्या *तयारीत* राज्यस्तरातील स्वयंसेवक परीश्रम घेत असून, संपूर्ण तयारी झालेली आहे. *येणार्या** भाविकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत.
कार्यक्रमाच्या नियोजनाविषयीची माहिती देतांना योगेश पाटील म्हणाले, शनिवारी (दि.४ फेब्रुवारी) सायंकाळी साडे पाच वाजता ‘अ’ अंकित श्वेत ध्वजा रोहण समारंभ पार पडेल. यानंतर सायंकाळी ६ वाजतापासून *श्री. संत प्रवर श्री विज्ञानदेव जी महाराज यांचा स्वर्वेद कथामृत ) हा *दिव्यवाणी कार्यक्रम सुरु होईल. सद्गुरु आचार्य श्री.स्वतंत्रदेवजी महाराज यांची अमृतवाणी उपस्थित भाविकांना श्रवण करता येणार आहे. यानंतर महाप्रसादाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होईल. रविवारी (दि.५ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता ‘अ’ अंकित श्वेत ध्वजारोहण होईल. यानंतर सकाळी साडे नऊ पासून* १००१ कुण्डिय विश्व शान्ति वैदिक महायज्ञ व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या धार्मिक समारोहासाठी राज्य व देशभरातून भाविक दाखल होणार असून, नाशिकच्या भाविकांनीदेखील या सुवर्णसंधीचा लाभ घेत कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
—
विहंगम योग साधनेविषयी..
विहंगम योग साधनेचे शारीरीक, मानसिक व आध्यात्मिक लाभ लाखो *साधक सहभागी होत आहेत. नेत्रदोष दूर होण्यासह अनिद्रेपासून मुक्ती, रक्तदाब, मधुमेह व अन्य रोगांवर कायम स्वरुपी नियंत्रण, रोग प्रतिकार शक्ती तसेच ऊर्जा यांमध्ये विलक्षण वृद्धी होते. सध्या मानसिक व्याधींचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. अशात तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता तसेच निर्णयक्षमतेत विलक्षण वाढ होण्यास अनेकांना मदत झालेली आहे. विशेष आंतरिक शांतीची अनुभूती भाविकांना मिळते आहे. वैदिक हवन यज्ञाचेही अनेक लाभ *अहेत* . यामध्ये भौतिक कामनांची पूर्ती, समाजात एकता व परस्पर प्रेमाची भावना दृढ होणे, मनातील कलुषित भावना व कुप्रवृत्तिंचे दमन, स्वार्थ, त्याग तसेच परोपकाराची भावना दृढ होते.