मनमाड मधील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल कोसळल्याने
विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प
लासलगाव : समीर पठाण
मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल मध्यरात्री कोसळल्यामुळे
इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असल्यामुळे विंचूर प्रकाशा महामार्गावरून वाहतूक वळवल्याने लासलगाव विंचूर मार्गावर वाहतूक वाढल्याने या महामार्गावर दोन्ही बाजूकडील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.लासलगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने लासलगाव व विंचूर येथे पोलिसांची संख्या वाढवली.या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला
तीन दिवसानंतर आज ढगाळ वातावरण निवळल्याने कडक ऊन पडले त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या आवारावर कांद्याची आवक वाढली.सकाळच्या सत्रात ५८३ वाहनांचा कांद्याचा लिलाव होऊन व्यापाऱ्यांच्या खळ्यात कांदा उतरवण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने याचा देखील वाहतुकीवर परिणाम झाला यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळित ठप्प होत होती.