नियमांची पायमल्ली, नऊ कृषी केंद्रांचे परवाने निलंबीत

 

कृषी विभागाचा दणका, कारवाई केलेल्या केंद्रात अनेक त्रुटी

नाशिक : प्रतिनिधी

कृषी विभागाने जिल्हयातील कळ्वण व देवळा तालुक्यातील नऊ कृषी केंद्रांचे परवाने निलंबन े केले आहे. जिल्हा भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत
या केंद्रात नियमांच उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने निलंबनाची कारवाई करत विक्रेत्यांना कृषी विभागाने दणका दिला आहे. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशाने व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान ज्या नऊ केंद्रांचे थेट परवाने निलंबन केले, त्या केंद्रात कृषी विभागाने घालून दिलेले नियम पायदंळी तुडवल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. जिल्हयात काही कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना पक्के बिले न देता त्यांना खते, बियाणे, किटकनाशके यांची विक्री केली जाते. यासंदर्भात कृषी विभागाने वेळोवेळी केंद्र चालकांना आवाहन करत शेतकऱ्यांना पक्के बिले देण्यास सांगितले आहे. तरीही त्याकडे विक्रेते कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. जिल्हा भरारी पथकाने धाडी टाकत ज्या केंद्रावर कारवाई केली आहे. तिथे अनेक त्रृटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे संबंधित दुकानदार विक्रेत्यांकडून शासनासह शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. खरीब व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके आदी शेती पिकाशी संबधित साहित्याची मोठया प्रमाणात आवश्यकता लागते. परंतु आही विक्रेत जाणुनबुजून व आर्थिक स्वार्थासाठी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. हे प्रकार टाळण्याकरिता कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती केली असून वेळोवेळी भरारी पथकांकडून दोषी कृषी केंद्रांवर धाडी टाकून कारवाइ करण्यात आल्या आहेत. परवाना निलंबानच्या कारवाईनंतर आता ज्या कृषी केंद्रात चुकीच्या पद्धतीने काम केले जात आहे. त्यांना यातून चाप बसणार आहे. मागील काही महिन्यांपासून जिल्हा भरारी पथकाने अनेक ठिकाणी केंद्रावर धाडी टाकत बोगस खते, किटकनाशके यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. तसेच संशयितांवर जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून नऊ जणांचे परवाने रद्द केल्यानंतर चुकीच्या पध्दतीने काम करणाऱ्या केंद्र चालकांना चाप बसणार आहे.

या केंद्राचे परवाने निलंबन
1)एकविरा फर्टीलायझर लोहणेर ता.देवळा
2 )गुरुदत्त कृषी सेवा केंद्र कळवण
3)जैन फर्टीलायझर लोणेर देवळा
4) न्यू विजय कृषी सेवा केंद्र लोणेर या.देवळा
5) विशाल कृषी मंदिर कळवण
6) सुनील बेबीलाल संचेती कळवण
7) सुरेश ट्रेडिंग कंपनी कळवण
8) सोनाई कृषी सेवा केंद्र दुगाव
9)स्वामी समर्थ कृषी सेवा लोणेर ता.देवळा
……………….
परवाना निलंबनाचे कारणे
1) वरील शिल्ल्क साठा व प्रत्यक्ष साठ्याचा ताळमेळ न बसणे.
2) साठा व भाव फलक न लावणे
3) साठा रजीस्टर अध्यावत नसणे.
4) शेतकऱ्यांना पक्के बिले न देणे.
5) युरिया खताच्या 20 खरेदीदारास विक्री .
………………………..

 

कारवाई टाळायची असेल तर नियमांचे उल्लंघन नको
कृषी विक्री केंद्र चालकांकडून कोणत्याही प्रकारे शेतकरी व शासनाची फसवणूक होणार नाही. याची काळ्जी घ्यावी. आमच्या पाहणीत जर कोणत्याही कृषी केंद्रामध्ये चुकीच्या पध्दतीने कामे सुरु आहे. तर त्यांच्यावर कठोर कारवाइ करण्यात येइल. मग तो कोणीही असो. शेतकरी बांधवांनी देखील खरेदेची पक्की पावती घ्यावीच. जिल्ह व विभागातील केद्राकडे लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची नजर सदैव राहील.
मोहन वाघ, (विभागीय कृषी सहसंचालक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *