नाशिकरोड पोलिसांची ‘ विशाल ‘ कामगिरी

 

दुचाकी चोरट्यासह : पाच लाखांच्या १३ दुचाकी जप्त

नाशिकरोड : प्रतिनिधी

नाशिकरोड पोलिसांनी पुन्हा एकदा ‘ विशाल ‘ कामगिरी केली असून दुचाकी चोरणाऱ्या सशयितासह पाच लाख किमतीच्या तब्बल १३ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. नाशिकरोड पोलिसातील गुन्हे शोध पथकाने शिताफीने योगेश शिवाजी दाभाडे (रा. अशोक नगर, सातपूर’ नाशिक ) या संशय ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
काही दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक भागातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. सदर गाडी चोरणाऱ्या चोरट्यास ताब्यात घ्यावे असे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते. या आदेशानुसार नाशिकरोड पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्याचा शोध सुरू केला. दरम्यान गेल्या महिन्यात सागर जाधव (रा. पाथर्डी रोड) नाशिक यांची मोटरसायकल नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथून चोरी गेली होती. व त्याबाबत त्यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतांना परिमंडळ दोन मध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त खबर मिळाली की, दुचाकी चोरणारा संशयीत योगेश शिवाजी दाभाडे हा नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे. त्यानतंर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, हवालदार विलास गांगुर्डे, सुभाष घेगडमल, विष्णू गोसावी, सचिन गावले, विशाल पाटील,मनोहर शिंदे, राकेश बोडके, केतन कोकाटे, सोमनाथ जाधव, समाधान वाजे, विशाल कुवर, महिंद्र जाधव, सागर आडणे,अजय देशमुख, योगेश रानडे, सागर पांढरे, मुश्रीफ शेख, स्वप्नील जुंद्रे आदींनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
संशयीत योगेश दाभाडे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हयाची कबुली दिली. दरम्यान या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी गुन्ह्यांची उकल करणारे पोलीस नाईक विशाल पाटील व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी,कर्मचारी यांचे अभिनंदन केले. दरम्यान नाशिकरोड पोलिसांनी आजवर विविध गुन्ह्यांची उकलं करत मुद्देमाल, दुचाकी जप्त करत संशयतांना वेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी पुन्हा 13 दुचाकी जप्त करत सराईत संशयताला ताब्यात घेत कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *